मुख्यमंत्र्यांच्या 'जलयुक्त' महाराष्ट्रात दुष्काळ

Update: 2018-10-09 07:21 GMT

महाराष्ट्रात सध्या काही भागात दुष्काळाची दाहकता जाणवायला लागली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात देखील दुष्काळाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. सरकार आढावा बैठका घेत आहे. मात्र, दुष्काळ जाहिर करत नाही. त्यात मराठवाड्यात दुष्काळ्याचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. त्यात विशेष म्हणजे या दुष्काळाचा फटका फळ बागांना बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बागायती शेती आता मुंडके टाकायला लागली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण उराशी असताना देखील पैठण तालुक्यातील पिकं माना टाकत आहेत. यातच महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात येते.

पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था तर धरण उराशी आणि शेतकरी उपाशी अशी झाली आहे. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे पिके करपून गेली आहेत, विहिरींनी तळ गाठले, तर उघड्या डोळ्यांनी पिके उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. पावसाने दगा दिल्यामुळे खरिपाची पिके वाया गेली आहेत. त्यातच पोटच्या मुलाप्रमाणे 10 वर्षे जपलेल्या मोसंबीच्या बागाला देखील गळती लागली आहे. गेली 10 वर्ष वाढवलेल्या बागा आता डोळ्या समोर जळू लागल्या आहेत. पाऊस दिसेनासा झाला त्यात प्रचंड ऊन पडत असल्याने मोसंबीला गळती लागली आहे.

काय आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मोसंबीच्या बागाची परिस्थिती पाहा: मॅक्स महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट

Full View

Similar News