पाऊस जास्त झाल्यानं कापसावर बोंडअळी, हरिभाऊ बागडेंच संशोधन

Update: 2018-01-28 18:08 GMT

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर कपाशीवरील बोंडअळीचे संकट कोसळल्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडअळीमुळे शेतकरी हतबल झाला असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. तसेच सरकारकडून याचे पंचनामे सुद्धा करण्यात आले आहेत. मात्र बोंडअळी ही जास्त पाऊस-पाणी झाल्यानं पिकावर आल्या असल्याचे नवीनच संशोधन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला आहे.

औरंगाबादमधील बिडकीन येथील एका कार्यक्रमात बोलत होते. कापसावर लागलेली बोंडअळी ही फक्त महाराष्ट्रमध्येच आहे आणि त्याला कारण मागच्या वर्षी झालेला चांगला पाऊस आहे. जलयुक्त शिवारमुळे अनेक विहिरींना पाणी चांगल्याप्रमाणात पाणी आहे.

यंदा आपल्याकडे पाणी जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी तीन-तीन पिके घेतली. जास्त पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाच्या पिकाला 'दे पाणी आणि काढ कापूस' असे केले. पाणी देऊ-देऊ कापूस काढले आणि त्यामुळे कापसाधील किड मरायला पाहिजे ती मेली नाहीत आणि तीच किड 'बोंडअळी' म्हणून समोर आली. बागडे यांनी बोंडअळीविषयी हा नवनीच शोध काढल्यानं शेतकऱ्यांनी कापसाच्या पिकाला पुढच्या वर्षी पाणी द्यावे की नाही? असा प्रश्न पडला आहे.

नेमकं काय बोलले विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाहा हा व्हिडीओ...

Full View

Similar News