भाजप-शिवसेना नाल्यातले पैसे खाते - जितेंद्र आव्हाड

Update: 2019-07-01 11:31 GMT

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. लोकांना पाऊस हवा आहे. धरणात पाणी नाही. पाऊस नाही पडला तर लोकांना पाण्यावाचून मरावं लागेल.पण नालेसफाईतून आपली घरं भरणारे या पाण्याच्या तुंबण्याला जबाबदार आहेत, असं म्हणत भाजप शिवसेनेवर निशाणा साधला.

नाल्याचं सफाईचे जे टेंडर फेब्रुवारीत काढून मार्च, एप्रिलमध्ये फायनल करायचं असतं आणि मे मध्ये नालेसफाई पूर्ण करायची असते. ती नालेसफाई होतंच नाही. ती मेच्या अखेरीस सुरू होते. आणि जूनच्या पहिल्या पावसात बंद होते. कचरा तसाच वाहून जातो आणि नाला पॅक होतो. त्यामुळे सर्व मोठे नाले तसेच आहेत. मुंबईत असो वा ठाण्यात असो.

वर्षोनुवर्षे हे नालेसफाई चे काम करणारे कंत्राटदार तेच आहेत. मग ते ठाण्यातील असो व मुंबईतील असो. सत्ताधारी भाजप शिवसेना नाल्यातले पैसे खाते आणि म्हणून मुंबई पाण्यात जाते हे आता वेगळं राहिलेलं नाही. असं म्हणत आव्हाड यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजप, शिवसेनेवर टीका केली.

Similar News