युती होताच शिवसेनेला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला का ?

Update: 2019-03-04 12:12 GMT

एकीकडे भारताच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेव्हा भाजप आणि शिवसेनेच्या युतीची बोलणी सुरु होती. जेव्हा भारताचे 40 जवान शहीद झाले असं माध्यमं सांगत होती. तेव्हा युतीतील नेते शिवसेना आणि भाजपची पुन्हा एकदा युती झाली असं सांगत होते. दोनही पक्षाचे शिर्ष नेतृत्व युती झाल्याच्या आनंदात होते.

मात्र, या युतीच्या घोषणेत उभय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. ना शिवसैनिक तर कुठेच नव्हता. कारण गेल्या चार वर्षात ज्याच्यांशी वैर घेतलं. त्यांच्याशी युती झाली होती. आता ग्रामीण भागाचा जर विचार केला तर शिवसैनिक असो किंवा भाजपचे जुने कार्यकर्ते असो या कार्यकर्त्यांना ना सत्तेत वाटा मिळाला, ना सत्तेचा फायदा झाला असंच एकंदरीत ग्रामीण भागात चित्र आहे. भाजपमध्ये इनकमिंग केलेल्या नेत्यांनी तर भाजपचा वर्षानुवर्षे झेंडा हातात घेणाऱ्या कार्यकर्त्याला डावल्याचं चित्र आहे.

बीड जिल्ह्यात तर आज महादेव नावाच्या शिवसैनिकाने ऐन महाशिवरात्रीच्या दिवशीच गळ्यात भगवा गमजा घालत आत्महत्या केली. महादेवाने शासनाच्या मुद्रा लोन, कुकुटपालन यासारख्या य़ोजनांसाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. वर्षोनो वर्ष सेनेचा झेंडा हातात घेत काम करणाऱ्या महादेवाची सत्ता शिवसेना सत्तेत भागीदार असताना देखील काम झाली नाही.

महादेव फक्त चेहरा आहे. यासारखे अनेक महादेव दररोज सरकारच्या दारात फाईल घेऊन जातात आणि परत येतात. एका पक्षाचे लेबल लावलेले हे कार्यकर्ते पक्षाचा आदेश आला की, घर दार सोडून काम करतात. त्यात तर शिवसैनिक नेहमीच पुढे असतो. हे आपण बाळासाहेबांच्या काळात पाहिले आहे. टपरीवर चालवणाऱ्यापासून ते भाजी विकणाऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेबांनी नगरसेवक, आमदार, खासदार मंत्री केले. ग्रामीण भागात शिवसेनेची फळी निर्माण केली. मात्र, आज ग्रामीण भागातील शिवसैनिकांची काय परिस्थिती आहे. याचा विचार नेतृत्वाने करणं गरजेचं आहे.

युती होण्यापुर्वीच्या वृत्तपत्र चाळली तर दररोज सरकारवर टीका करणारी शिवसेना आज सगळं विसरली आहे का? असा प्रश्न प़डल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना आणि भाजप यांच्या युतीने शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न संपले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला का? दूध, भाजीपाला रस्त्यावर टाकणाऱ्या शेतकऱ्याचे प्रश्न सुटली आहेत का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. कारण, युती पुर्वी शेतकऱ्यांची काळजी करणाऱी शिवसेना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणूनच आम्हाला हा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न संपले आहेत काय़? कारण युती पुर्वी जी शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भाजप सोबत भाडत होती. सोशल मीडियावर व्यक्त होत होती ते आता जवळ जवळ विसरली आहे का? पाहा व्हिडीओ

Full View

Similar News