धुळ्यात धर्मा पाटील यांच्या निधनाच्या निषेधार्थ रास्ता रोको

Update: 2018-01-29 05:30 GMT

शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनाच्या निषेधार्थ धुळे-दोंडाईचा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला असून ग्रामस्थ सरकारविरोधात घोषणा देत आहेत. धर्मा पाटील यांच्या निधनाची बातमी कळताच गावात शोककळा पसरली आहे.

भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून आठवड्याभरापूर्वी मंत्रालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचं रविवारी रात्री जे. जे. रुग्णालयात निधन झाले. दरम्यान,जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा द्या मिळत नाही तोपर्यंत वडिलांचे पार्थिव ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन औष्णिक वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. सुपिक जमीन असतानाही केवळ चार लाख रूपये मोबदला दिल्याने ते नाराज होते. मोबदला वाढवून मिळावा यासाठी त्यांनी अनेक मंत्री, अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. बागायती शेती असलेल्या पाटील यांना इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी भरपाई म्हणजेच केवळ चार लाख रुपये मोबदला देण्यात आला होता. पाटील यांनी या प्रकरणी मंत्रालयात अनेक वेळा गेले असता त्यांना कुठल्याही प्रकारची मदत न मिळाल्यानं त्यांनी २२ जानेवारी रोजी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Full View

Similar News