अजय बारसकरांचं खळबळजनक विधान; जरांगे पाटलांविरोधात उद्या बॉम्ब फोडणार

Update: 2024-02-24 14:49 GMT

मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अलीकडच्या काळात विवादित वक्तव्य करणारे अजय बारसकर महाराज हे सध्या सगळीकडे चांगलेच चर्चेत आले आहेत. अशातच त्यांनी जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना असं म्हटले आहे की, पाटलांच्या नातेवाईकांकडे 45 डंपर कसे काय आले ?, याची चौकशी करण्यासाठी ते ईडीकडे जाणार असल्याचे म्हणाले आहे. उद्या (25 फेब्रुवारी) मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सकाळी 11 वाजता बाम्ब टाकणार असल्याचे खलबळजनक विधान केले आहे.

अजय बारसकर यांचं खळबळजनक विधान -

2017 मध्ये मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणासंदर्भात काय मागणी होती, याबद्दल बारसकर म्हटले आहेत की, ओबीसींपेक्षा वेगळ्या आरक्षणाची मागणी जरांगे पाटील यांची होती. मात्र आता जरांगे यांची भूमिका बदलून स्वतंत्र मराठा आरक्षणाऐवजी ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे अशी भूमिका बनली आहे. मनोज जरांगेवर पुण्यामध्ये फसवणुकीची केस आहे असा यावेळी आरोप करत त्यांनी जरांगे कसा आहे त्याबद्दल उद्या (25 फेब्रुवारी) बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं आहे.

मराठा बांधव आक्रमक; बारसकरांच्या सुरक्षेत वाढ

राज्य सरकारकडून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच अजय बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आता मराठा समाजाच्या रोषाला बारसकर यांना आता सामोरं जावं लागत आहे. 23 फेब्रुवारी रोजी चर्चगेट परिसरामध्ये प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी हल्लेखोरांना अडवत ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर बारसकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News