काँग्रेसला खाते गोठवण्याच्या मुद्द्यावर दिलासा, आयटी न्यायाधिकरणाने दिली बुधवारपर्यंत मुदतवाढ

Update: 2024-02-16 13:23 GMT

काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या खात्यांना आयटी विभागाकडून गोठवण्यात आले आहे. मात्र आता आयटी न्यायाधिकरणाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला असून बुधवारपर्यंत काँग्रेसच्या खात्यांवरील बंदी उठवण्यात आल्याचे पक्षाचे नेते विवेक तन्खा यांनी सांगितले. नुकतीच काँग्रेसची बाजू दिल्लीतील आयटीएटी खंडपीठासमोर मांडून काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


न्यायालयासमोर तन्खा आपली भूमिका मांडत म्हणाले की, "आमच्याकडे पुरावे आहेत, आणि आम्हाला असमान शिक्षा होऊ शकत नाही. ११५ कोटी रूपयांचा कर आमच्यावर कसा लावला जातो या गुणवत्तेवर चर्चा करायची आहे". सुनावनीनंतर त्यांना न्यायालयाने दिलासा दिला असून आता काँग्रेस पक्ष बँक खाते वापरू शकतो असं तन्खा म्हणाले असून पुढील सुनावणी बूधवारी होणार आहे.

अजय माकन यांचा दावा

पक्षाचे जेष्ठ नेते अजय माकन यांच्याकडून यापूर्वीच दावा करण्यात आला होता की, ते कर्मचाऱ्यांचे पगार काढू शकत नाहीत आणि बिलेही देऊ शकत नाहीत. काँग्रेससोबतच युवक काँग्रेसची खातीही गोठवण्यात आली असल्याचे माकन यांचे म्हणणे आहे. अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

कालच निवडणूक रोख्यांबाबतचा निर्णय आला

सर्वोच्च न्यायालयाने कालच इलेक्टोरल बाँड्सबाबत मोठा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड्सची वैधता घटनाबाह्य ठरवत रद्द केली असून. यामुळे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे निवडणूक रोखे वैध मानले जाऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर न्यायालयाने आता निवडणूक रोख्यांच्या खरेदीवर बंदी घातली असून SBI ला निवडणूक आयोगाला बाँडची संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे.

Tags:    

Similar News