शिंदे गटात आमदारांत धक्काबुक्की; नक्की काय घडलं? वाचा थोडक्यात

Update: 2024-03-01 10:06 GMT

शिंदे गटाचे मंत्री दादा भूसे व त्यांचे सहकारी आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी झटापट केल्याचा दावा केला जात आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात या घटनेमुळे एकच गदारोळ माजला आहे. पण मंत्री शंभुराज देसाई यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका कामाविषयी मंत्री भुसेंसोबत बोलत असताना आमदार थोरवेंचा आवाज वाढला एवढंच, असं ते म्हणाले.

आमदार थोरवे व मंत्री दादा भुसे यांच्यात विधानभवनाच्या लॉबीत शाब्दिक चकमक झाली व त्यानंतर हा वाद झटापटीपर्यंत पोहचला. पण मंत्री शंभुराज देसाई व आमदार भरत गोगावले यांनी वेळीच मध्यस्थी करत हा वाद मिटवला. या घटनाप्रकाराची माहिती बाहेर येताच देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधत असा कोणताही प्रकार घडला नाही, असे स्पष्ट केले. 

Tags:    

Similar News