...आता उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांच्या बांधावर

Update: 2019-11-01 15:05 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेतीचं नुकसान झाल्याची पाहणी सुरू केली आणि आता इतर पक्षांनाही जाग आल्याचे चित्र दिसत आहे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ही नुकसानीची पाहणी करण्यासाठी औरंगाबादला जाणार आहेत. आज सकाळी शरद पवारांनी नाशिक मध्ये जाऊन शेती आणि द्राक्षबागांचे नुकसान झाल्याची पाहणी केली.

दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देऊ असे आश्वासन दिले. पण, त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसल्याचंही कबूल केलं.

सरकार स्थापनेची चढाओढ सुरू असताना शेतकऱ्यांकडे पाहायला राजकीय नेत्यांना वेळ नव्हता. पण, माध्यमांनी दखल घेतल्यानंतर राजकीय नेत्यांची डोळे उघडले आहेत. मॅक्स महाराष्ट्र एक आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा दाहक चित्र लोकांपुढे मांडलं आहे.

Similar News