शेतकऱ्यांचा लॉंग मार्च : जिल्हाधिकारी कचेरीसमोरच शेतकऱ्याचा मृत्यू
शेतकऱ्यांचा विविध मागण्यासाठी नासिक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढला. यात भाऊराव बाबुराव गवे या 65 वर्ष शेतकऱ्याचा भोवळ येऊन मृत्यू झाला आहे;
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलकांचा मुक्काम आणि स्वयंपाक -
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लॉंग मार्च मधील आंदोलकांनी ,रस्त्यावर स्वयंपाक करत जेवण करत रस्त्यावरच मुक्काम केला.
माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला लाँग मार्च काल दुपारी शहरात दाखल झाला . जिल्ह्यातील हजारो आंदोलक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राहू अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे. शहरातील पहिला मुक्काम नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठोकला आहे. दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील रस्त्यावरच स्वयंपाक तयार करून रात्रीचे जेवण केले. जेवण झाल्यावर आंदोलकांनी रस्त्यावरच मुक्काम झोपले.
शेतकऱ्यांच्या या आहेत मागण्या -
वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा, घरकुल योजणांचे अनुदान पाच लाख रुपये करा, जुनी पेन्शन लागू करा, कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवा, शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्यात यावी व थकित वीज बिल माफ करा, नदी जोड योजना बंद करून छोटे बंधारे बांधा,
आज मंत्रालयात बैठक -
शेतकरी आंदोलकांच्या विविध मागण्यासाठी आज महसूल व वनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे यात माजी आमदार जे पी गावित, शेतकरी आदिवासी प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.