शेतकरी उपाशी अन् सत्ताधारी तुपाशी; विरोधकांनी दिल्या विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणा
अर्थसंकल्पीय अधिवेशन Live Update : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अंतिम दिवस आहे. अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत असून 'शेतकरी उपाशी अन् सत्ताधारी तुपाशी' अशा घोषणा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्याला घेऊन विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत.