तुकोबारायांचा अभंग वाचत फडणवीसांचा उध्दव ठाकरेंना टोला; काय म्हणाले वाचा
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातील जगतगुरु संत तुकाराम महाराज सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात, "गाढवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच", असं म्हणत यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांसह ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
यावेळी संत तुकाराम महाराजांची पगडी परिधान करीत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली अन् तुकोबारायांचा अभंग वाचत विरोधकांना उद्देशून म्हटले की, "गाढवाचे अंगी चंदनाची उटी, राखेसवे भेटी केली तणे." म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी जरी लावली तरी ते उकीरड्यावर जाऊन राख अंगाला लावूनच घेणार.
मी कुणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे. त्यामूळे फार सांगण्याची आवश्यकता नाही. कारण सध्याचा राजकीय धुराळा उडाला आहे, या धुराळ्यात कोण आपल्या अंगाला राख लावून घेत आहे हे वेगळ्या पध्दतीने सांगायची आवश्यकता नाही, असे फडणवीस म्हणाले.