राष्ट्रपती राजवटीचा शिवसेनेला असाही दणका..

Update: 2019-11-13 10:22 GMT

सरकार स्थापनेचा घोळ संपत नसल्यानं अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (Precidency Rule) लागू झाली आहे. याचा दणका पहिला शिवसेनेला बसला आहे. राष्ट्रपती राजवटीनंतर सर्वाधिकार हे राज्यपाल यांना असतात. त्याच बरोबर नियमांचं उल्लंघन होत नाही ना याची काळी अधिकारी वर्ग काटेकोरपणे घेत असतो. त्यामुळे मंबई महानगर पालिका (BMC) अधिकारीही आज कामाला लागले.

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं मातोश्री निवासस्थान गेल्या २० दिवसांपासून चर्चेत आलं आहे. अनेक शिवसैनिकांनी या निवासासमोर बॅनर लावले होते. त्यावर आता पर्यंत काही कारवाई नाही झाली. पण काल राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर पालिका अधिकारी जागे झाल्याचं पहायला मिळालं.

आज सकाळी पालिका अधिका-यांनी हे बॅनर काढून टाकले. नियमानुसार असे बॅनर लावता येत नाही कोर्टाने ही बंदी घातली आहे. पण महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने ते काढण्यात येत नव्हते.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/425397051481140/?t=1

Similar News