उध्दव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का; रवींद्र वायकरांचा शिंदे गटात प्रवेश

ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर रवींद्र वायकरांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्याचा घेतलेला हा निर्णय ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का देणारा ठरला आहे.;

Update: 2024-03-10 16:36 GMT

उध्दव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात रविवारी रात्री जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हा प्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर वायकरांनी घेतलेला हा निर्णय ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का देणारा ठरला आहे.

काय म्हणाले रवींद्र वायकार?

माझ्या मतदारसंघातील कामे मार्गी लागली पाहिजे, या दृष्टीने मी प्रामुख्याने हा निर्णय घेतला आहे. रॉयल पंप एरियात पाण्याचे पंप, धोरणात्मक निर्णय बदलण्याची गरज होती म्हणून लोकांचे काम करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्याय देतील, म्हणून शिवसेनेत दाखल झालो, असे यावेळी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? 

एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत रवींद्र वायकर यांनी प्रवेश केला आहे. त्यांचे स्वागत आहे. मी असेल किंवा गजानन कीर्तिकर असेल आम्ही सर्वच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन काम करत आलो आहोत. वायकरांनी आपल्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी जो निर्णय घेतला आहे, त्याचे मी स्वागत करतो.

Tags:    

Similar News