अचानक कसा सुरू झाला हा प्रकार?

Update: 2017-10-03 10:15 GMT

विषारी किटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त जणांचा जीव गेलाय, तर 300 पेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर रुग्णालयात उपचार घेत आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठ आणि किटकनाशक विकणाऱ्या कंपन्या यवतमाळच्या या घटनेस जबाबदार असल्याचं परखड मत ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केलंय.

दरम्यान शेतकऱ्यांनीही विषारी किटकनाशकांची फवारणी करताना काळजी घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ‘शेतकऱ्यांनो विषाची परीक्षा करु नका’ असं आवाहनंही डॉ. निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना केलंय. मुबंईच्या परेल येथील दुर्घटनेनं अवघा देश हादरला मग यवतमाळच्या घटनेवर सरकार काय करतंय, ही माणसं नाहीत का? असा सवालंही त्यांनी व्यक्त केलाय.

https://youtu.be/pyO1qu0NLQI

Similar News