#माझंमत : बांधावरील शेतकऱ्यांशी चर्चा करा – नागेश करपे

Update: 2017-04-22 07:34 GMT

शेतकरी हा विषय आपण जेव्हा-केव्हा चर्चेत घेतो. त्यावेळी राजकीय पुढारी कृषी विषयाचे तज्ज्ञ असल्याची झूल पांघरून चर्चा करतात. मुळात शेतीचे प्रश्नचत यांना कळतात की नाही असा मला नेहमी प्रश्न पडतो. कारण शेतकऱ्यांच्या अत्महत्या हा विषय कर्जमाफी पूरता मर्यादेत नाही. अथवा मदतीपुरता मर्यादीत नाही. या दोन्ही गोष्टी तात्पूरती मलमपट्टी ठरणाऱ्या आहेत. राजकीय लोकं या प्रश्नाचा वापर आपल्या स्वार्थासाठी करुन घेताना पहायला मिळतात. सत्ताधारी तर अजून अभ्यासाची भाषा बोलत आहेत. मुळात बांधावरील शेतकरी, राजकीय वारसा असलेले शेतकरी आणि मजूर शेतकरी अस वर्गीकरन व्हायला पाहिजे.

आपल्या माहितीस्तव शेतकऱ्याला कसे फसवले जाते याची सत्य परस्थिती सांगतो. उस्मनाबाद जिल्हयातील अणदूर गावातून महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गात अनेक शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या. यामध्ये तुळजापूर तालुक्याचे आमदार मधुकरराव चव्हाण यांचही शेत, घर, झाडे, पाईपलाइन इत्यादी अधिग्रहित केल्याच दाखवू कोटीच्या घरात रक्कम दिली गेली. तर त्यांच्याच शेजारी असलेल्या धुगे परीवाराला अद्याप छदमाही मिळाला नाही. याची दखलही कोणी घेतली नाही. आमदार महोदयांनी आपल्या राजकीय पदाचा वापर करून घेत हे शक्य केलं. तो सामान्य बांधावरला शेतकरी जमिन जाउनही खितपत पडला आहे. आमदाराचे जे नुकसान दाखवल आहे ते नुकसान प्रत्यक्षात झालेल नाही. हा जो प्रकार आपल्याला सांगितला असाच प्रकार प्रत्येक योजनेत सुरू आहे. प्रत्यक्षात जे शेतकरी दिवस रात्र कष्ट करतात त्यांना बँकाच कर्ज मिळत नाही जे काही कर्ज आहे ते अगदी पाच पन्नास हजारा पर्यंत आहे. मला प्रश्न असा पडतो या मुदयावर कोणच का बोलत नाही?

निसर्गाची अवकृपा, शेती मालाला हमीभाव, शेत मजूराचा प्रश्न मिटवणे, अधुनिक तंत्राचा वापर, नेहमी करता खेळतं भांडवला, विज पाणी, हे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मुळात आपल्याकडे शेतकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा व परंपरागत शेती करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशामुळे शेतकरी गंडला जातो. फसवणारे तर पावलो पावली आहेत.

हा विषय संपवायचा असेल तर बांधावरील शेतकऱ्याच्या चर्चा घडल्या पाहिजेत. सामूहिक शेती करणे या गोष्टी रुजल्या पाहीजे.

नागेश करपे

उस्मनाबाद.

8888483254

( लेखकानं मांडलेले मुद्दे आणि विचार हे त्यांचे व्यक्तिगत विचार आहेत. )

Similar News