बोगस बियाणे विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Update: 2017-11-10 06:36 GMT

राज्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाने आधीच त्रस्त झाले आहेत त्यात सरकारी अनस्था बळीराजाचा बळी घेतोय. वर आणखी एका नव्या संकटाची भर पडली आहे ती म्हणजे बोगस बी बियाणे.

शेतात लावलेल्या पीकातून चांगलं उत्पन्न होईल अशी आस लावून बळीराजा दरवर्षी पीक पेरतो खरं. मात्र आसमानी संकट आड येते आणि हातात काहीच येत नाही. अासमानी संकटाबरोबर आता सुलतानी संकट ही शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं आहे. शेतकरी बाजारातून विकत घेत असलेले बियाणे हे बोगस असल्याचे समोर अाले आहे. बोगस बियाणं विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्यामुळे या बोगस कंपनीचा छापा टाकून औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बोगस बियाण्यांच्या कारखान्याला पोलिसांनी टाळे ठोकले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

औरंगाबादच्या एका नामांकित कंपनीच्या नावानं ही कंपनी बियाणे विकायची. फक्त औरंगाबादच नाही, तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा या कंपनीचे बियाणे विक्री सुरु होती. मात्र काही शेतक-यांच्या तक्रारी आणि पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकला. सोबतच त्यांच्या बुलढाणा, नगर आणि औरंगाबादच्या गोडाऊनवर छापे टाकत लाखो रुपयांचे बियाणे जप्त करून गोडाऊनला टाळे ठोकले आहे.

Similar News