‘बीटी बियाण्याबाबात पुनर्विचार होणार’

Update: 2017-10-03 13:25 GMT

यवतमाळमध्ये १८ शेतक-यांचा विषारी औषधाने मृत्यू झाल्यानंतर बीटी कपाशीच्या बियाणाच्या वापराबाबत संसदेच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी समितीमध्ये पुनर्विचार होणार असल्याची माहिती संसदेच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी समितीचे सदस्य खा. नाना पटोले यांनी दिलीय. बियाणांच्या कंपण्या बीटी कपाशीवर बोंड अळी येणार नाही, असा दावा करतात. मात्र यवतमाळसह राज्यात बऱ्याच भागात बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर किटकनाशकं फवारताना यवतमाळ जिल्ह्यात 18 शेतकऱ्यांचा जीव गेला आणि शेकडो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे बीटी कपाशीच्या बियाण्याच्या वापरावर पुनर्विचार करु, असं मत संसदेच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी समितीचे सदस्य खा. नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.

https://youtu.be/UPQdoM0MBi4

Similar News