पदवीधर तरुणाने हेरला हळद शेतीचा मूलमंत्र

Update: 2017-11-07 11:59 GMT

आपले पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता बुलडाणा जिल्ह्यातील बोथाकाजी येथील राहुल गावंडे या तरुणाने सर्वसाधारण पिकांना फाटा देत शेतीच्या माध्यमातून एक नवीन प्रयोग केला आहे आणि तो म्हणजे हळद शेती...

राहुलने या हळद शेतीच्या माध्यमातून लाखोंचा नफा मिळवला असून अनेक तरुणांना मजुरीच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला आहे. हळद पिकाच्या मशागत आणि खर्चाला कमी लागेल अशा नवीन लागवडीच्या पद्धतीचा आणखी नवीन प्रयत्न देखील राहुल करत आहे. तसेच आधुनिक पद्धतीने पेरूची लागवड करण्यासाठी तयारीही सुरू केली असल्याचे त्याने सांगितले आहे. एकंदरीतच नोकरीच्या मागे न धावता आपल्या शिक्षणाच्या जोरावर शेतीच्या माध्यामातून उच्चशिक्षित राहुल गावंडे लाखोंचा नफा घेतोय.

Full View

Similar News