नागपूर जिल्ह्यात किटकनाशकांच्या बळींचा आकडा वाढतोय!

Update: 2017-10-13 13:01 GMT

नागपूर: विषारी किटनाशकांमुळे नागपूर जिल्ह्यात सात शेतकऱ्यांचा मृत्यु झालाय. तर 10 विषबाधा झालेले शेतकरी उपचार घेत आहेत. मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्यानं या कुटुंबावर आभार कोसळलंय. अनेक वर्षापासून पिकांना खतं दिली जात होती, किटकनाशकं फवारली जात होती. एवढे वर्ष काहीच झालं नाही मात्र, नेमकं याच वर्षी काय झालं? असा प्रश्‍न या कुटुंबियांना पडलाय. नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्‍यातील पावनगौला या गावातील संभाजी वांगे यांचाही मृत्यु खतं आणि किटकनाशक फवारणी करताना झाला आहे. दरम्यान याच संभाजी वांगे कुटुंबियांशी बातचित केलीय आमचे नागपूरचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी

 

Full View

Similar News