दिवाळी कशी करावी साजरी ? शेतकऱ्यांचा सरकारला प्रश्न...

Update: 2017-10-17 11:20 GMT

धुळे: साक्रीमध्ये पांढऱ्या सोन्याचा (कापसाचा) शेतकरी हतबल होताना दिसून येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. शेतात सततची नापिकी आणि परतीच्या पावसाने हिरावून घेतलेले पीक यामुळे शेतकरी वर्गाला अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

जिल्ह्यातील साक्रीपासून काही अंतरावर असलेले दातर्ती गावातील शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींची व्यथा मॅक्स महाराष्ट्रासमोर मांडली आहे. कर्जमाफीची घोषणा फक्त कागदावरच आहे अशी प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अशा अडचणींचा सामना करावा लागतोय. भाऊबीज सणाला बहिणीला ओवाळनी म्हणून भावाने चेक द्यावा का असा सवाल मोदी सरकारला विचारला आहे. नोटाबंदीमुळे साक्री शहरातील बाजारपेठा पूर्ण पणे ठप्प झाले असून शेतकरी देखील हतबल झालेला आहे

पांढऱ्या सोन्याला (कापसाला) भाव नाही आणि धुळे जिल्ह्यात कापसाचे काही व्यापाऱ्यांनी मापात-पाप करताना आढळून आले होते यात देखील शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांवर सरकार लक्ष कधी देणार, जिल्ह्यात दिवसातून फक्त 2 तास वीज मिळत आहे यात शेतींना पाणी सोडायचे तरी कधी, जिल्ह्यात 16 तास लोडशेडिंग सुरू आहे तरी देखील ऊर्जा मंत्री म्हणतात की महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त आहे साहेब पुरावा दिला आहे आता तरी आश्वासन देणं बंद करा, शेतकऱ्यांनी अशी व्यथा मॅक्स महाराष्ट्रासमोर मांडली.

https://youtu.be/p_m12Xi81nk

Similar News