असे असेल राष्ट्रीय शेतकरी संपाचे स्वरुप

Update: 2018-06-01 07:02 GMT

अवघ्या जगाचा पोशिंदा शेतकरी आजपासून १० दिवसाच्या संपावर जात आहे. राष्ट्रीय किसान महासंघानं या संदर्भात घोषणा केली असून राज्यातील शेतकरी आजपासून १० जूनपर्यंत संपावर जाणार असल्याचे किसान महासंघाच्या वतीनं सांगण्यात आले आहे.

असे असेल राष्ट्रीय शेतकरी संपाचे स्वरुप

एक जून पासून ६ जूनपर्यंत शहरात जाणारी फळे, भाजीपाला, दूध यांचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

६ जूनला शेतकरी मध्यप्रदेशमधील मंदसौर येथे सरकारच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या दु:खात सहभागी होत शिवराज सिंह सरकारच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहतील तसेच सरकारचा निषेध करतील.

८ जूनला सरकारचा निषेध म्हणून असहकार दिवस पाळला जाणार, या असहकार आंदोलनात शेतकरी सरकारच्या कोणत्याही आदेशाचे पालन करणार नाही. तसेच या आंदोलन दरम्यान कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी आंदोलक घेणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

१० जूनला दुपारी २ वाजेपर्यंत संपुर्ण भारत राहणार बंद

या संपु्र्ण आंदोलना दरम्यान शहराकडे होणारा फळे, भाजीपाला, दूध यांचा पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या शेतकरी संपादरम्यान जर कोणत्याही व्यक्तीला फळे, भाजीपाला, दूध विकत घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीने खेड्यामध्ये येऊन शेतकऱ्यांचा माल शेतकऱ्यांनी गावात लावलेल्या दुकानावर शेतकऱ्यांनी ठरवलेल्या भावाप्रमाणे खरेदी करावा.

Similar News