मजुरांना द्यायला पैसे नाही, शिक्षण सोडून शेतकऱ्यांची मुलं शेतात

Update: 2020-10-03 11:56 GMT

मराठवाड्यातील शेतीचं अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याच्या शेतातील टोमॅटो अर्ध्यापेक्षा जास्त सडला आहे. या पिकातून दोन लाख रुपये उत्पन्न होण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र आता हातात फक्त 50 ते 60 हजार रुपये पडणार आहे. त्यामुळे लावलेला पैसा तर सोडा पण एक लाख रुपयांची नुकसान झाल्याचं ते सांगतायत. एवढेच काय मजुरांना देण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण घेत असलेल्या मुलाला शेतात टोमॅटो तोडण्यासाठी आणण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. यासर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी.

Full View

Similar News