या कारणांमुळे राज्यातील शेतकरी गेला संपावर

Update: 2018-06-01 06:05 GMT

अवघ्या जगाचा पोशिंदा शेतकरी आजपासून १० दिवसाच्या संपावर जात आहे. राष्ट्रीय किसान महासंघानं या संदर्भात घोषणा केली असून राज्यातील शेतकरी आजपासून १० जूनपर्यंत संपावर जाणार असल्याचे किसान महासंघाच्या वतीनं सांगण्यात आले आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

१) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.

२) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.

३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या.

४) शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, या मागण्यांचा समावेश आहे.

Full View

गेल्या वर्षी नगर जिल्ह्यातील पुणतांब्यातून सुरुवात झालेल्या शेतकरी आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. या आंदोलनात देखील याच मागण्यांचा समावेश होता.

दरम्यान या १० दिवसांच्या काळात शेतकरी आपला कोणताही माल विक्रीसाठी काढणार नाही. ठिकठिकाणी दूध-भाजांच्या गाड्या अडवण्यासा सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खेड-शिवापूर टोलनाक्यावर हजारो लीटर दूध रस्त्यावर टाकून शेतकरी संघटनांनी सरकारचा निषेध केला. रात्री अडीचच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर हा प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर दुधाची नदी वाहत असल्याचं चित्र दिसलं.

या कारणांमुळे शेतकरी गेला संपावर

Full View

Similar News