ज्याने घास दिला त्यानेच तोंडचा घास पळवला!

Update: 2020-09-13 07:43 GMT

सांगली जिल्हयाला ज्या पावसाने पीक जोमात येण्यास मदत केली. त्याच पावसाने आता तोंडचा घास पळवला आहे. या पावसामुळे ऊस, ज्वारी, बाजरी, भुईमूग या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. रात्री अचानक सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेले ज्वारी, ऊसाचे पीक भुईसपाट झाले. भवानी नगर या गावातील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मॅक्समहाराष्ट्र कडे मांडली. वर्षभर पैसे खर्च करून या शेतकऱ्यांनी ऊसाच्या पिकाचे जतन केले.

आता कारखाने सुरू व्हायची वेळ झाली आणि ऊसाचे पीक भुईसपाट झाले. यामुळे याचे वजन घटणार असल्याचे शेतकरी सांगतात. या भागात शेतकरी नगदी पिकाबरोबरच जगण्यासाठी आवश्यक असलेल्या धान्य पिकाचे उत्पादन घेत असतो. त्यातून त्या शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. या पिकाचे नुकसान झाल्याने आता वर्षभर या शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडणार आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Full View

Similar News