शेतकरी आंदोलन: 100 दिवस पूर्ण, घरावर काळे झेंडे लावून केंद्रसरकारचा निषेध

Update: 2021-03-06 09:51 GMT

Image Source: National Herald 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे रद्द करावेत व किमान हमी भाव कायदा अस्तित्वात आणला पाहिजे. या मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत.

या आंदोलनाला १०० दिवस झाले तरी केंद्र सरकारने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. आज केंद्र सरकारचा निषेध म्हणून देशभरातील शेतकरी एक दिवस घरावर काळा झेंडा, काळी फीत किंवा वाहनावर काळा झेंडा लावून निषेध करणार आहेत.

Similar News