Farm Laws Repeal Bill : कोणत्याही चर्चेविना कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर

Update: 2021-11-29 08:57 GMT

विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं द्यायला सरकार तयार आहे, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, पण त्याच्यात काही मिनिटांनंतर केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक सरकारने कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर केले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी सरकार सर्व प्रश्नांवर चर्चेला तयार आहे, असे सांगत विरोधकांना सहकार्याचे आवाहन केले, पण त्यानंतर तासाभरातच कोणत्याही चर्चेविना सरकारने कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर केले. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी हे विधेयक मांडल्यानंतर काही क्षणातfarm law repeal bill passed in loksabha without discussionfarm law repeal bill passed in loksabha without discussion त्यावर आवाजी मतदान घेण्यात आले आणि लोकसभेने शेती कायदे रद्द करण्याचे विधेयक चर्चेशिवाय मंजूर केले. यानंतर लोकशेबेचे कामकाज मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

पण या विधेयकावर आधी चर्चा घ्यावी अशी मागणी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी कृषी काये रद्द करण्याच्या मागणीसाठी संसद भवन परिसरात निदर्शने देखील केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. पण जोपर्यंत संसदेत कायदे रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत आघार घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.

Similar News