बुलडाणा लॉकडाऊनच्या काळात ७८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Update: 2020-07-25 16:14 GMT

एकीकडे कोरोनाने अनेकांचे प्राण घेतलेले असताना बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात ७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या ४ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माल विकला गेला नाही... बाजारपेठ असल्याने भाजीपाला तर अक्षरशः फेकून द्यावा लागला.. शेत मालाला भाव नाही तर कुणाच्या हाताला मजुरी नाही....अशी परिस्थिती असताना बुलडाणा जिल्ह्यात ७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

२२ मार्च ते 21 जुलै दरम्यान जिल्ह्यात 78 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत , ज्यापैकी 9 आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या आहेत. तर 28 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या वेगवेगळ्या कारणाने मदतीस अपात्र झाल्या आहेत. तर 41 आत्महत्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे... पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. मात्र वेगवेगळ्या कारणाने जिल्ह्यात चार महिन्यात 78 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याने खळबळ उडाली आहे.

या आत्महत्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे झालेले आहेत असा आरोप किसान सभेने केला आहे. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत नाकारण्यात आली आहे त्यांना ती मदत तातडीने देण्याची मागणीही किसान सभेने केली आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये मजूर, कामगार, शेतकरी या सगळ्यांना सर्वाधिक फटका बसला. पण बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी या संकटातून सावरत नाहीत तोच बोगस बियाण्यांची संकटामुळे शेतकऱ्यांचं आणखी नुकसान झालेले आहे. संकट कोणतेही असो सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्याचंच होतं. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकार कायमस्वरूपी धोरण कधी आखणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे

Similar News