यूजर फ्रेंडली Wikipedia एक उत्तम सोशल माध्यम

Update: 2017-04-20 07:34 GMT

सोशल माध्यमात विजिटर्सच्या बाबतीत जगात टॉप १० मध्ये असणार्‍या विकिपीडियाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ, सोशल मीडियावर वावरत असताना आपल्याला विविध सोशल नेटवर्किंग sites वर आपण सर्फिंग करत असतो. पण, एखादी व्यक्ती असो शहर असो किंवा कोणती बाब असो विकिपीडियाची गरज हल्ली सर्वांनाच भासते. कारण विकीपिडिया म्हणजे ऑनलाइन मोफत माहितीची बँक ज्याला आपण ज्ञानाचे भांडारही म्हणू शकतो! विकिपीडिया साधारण सर्वच भाषेत उपलब्ध आहे.याच प्रमाणे विकिपीडियाचे अनेक प्रकल्प आहेत ते सर्वांना माहिती असणे फार गरजेचे आहे.

आपण गुगल वापरत असताना एखाद्याच्या डिटेल्स पाहण्यासाठी संबधित शब्द टाकून सर्च करत असतो पण ९०%+ वेळा संबधित माहिती विकिपीडियाच्याच संकेतस्थळावर सापडत असते. म्हणून विकिपीडियाचे महत्व कैकपटीने वाढते.

संस्थापक - जिमी वेल्स आणि लारी संगर

सुरवात - १ जानेवारी २००१

एकूण उपलब्ध भाषा - २९५

मालकी - विकिमीडिया फाऊंडेशन

विकिपीडीया या प्रकल्पाचे उद्दिष्ट जगातील सर्व भाषेत ज्ञानकोष तयार करणे आहे. आता विविध भाषेत १.५ करोडच्या वर लेख आहेत. यात सर्वाधिक माहिती इंगजीत आहे. मराठीतही आजवर ४६,८००+ विविध विषयावरिल लेख आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहेत.

विकिपीडिया ही जगातील सातव्या क्रमांकाची सोशल मीडियाची वेबसाइट आहे. जगभरातील ५० कोटींपेक्षा जास्त भेटी प्रतिमहिना विकिपीडियावर जातात. आपल्याला आपल्याला ज्या विषयाची माहिती हवी त्याची सर्व माहिती तेथे उपलब्ध असते. उदा. तुम्हाला चीन, अमेरिकाविषयी जाणून घ्यायचे आहे किंवा कोणत्याही बाबीची माहिती त्वरित पाहिजे तर मराठीसह हव्या त्या भाषेत ही माहिती विकीपीडियावर उपलब्ध आहे.

मूळ विकिपीडिया लिंक:- http://en.wikipedia.org

मराठी विकिपिडिया लिंक:- http://mr.wikipedia.org

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे उपलब्ध असणारा सर्व डाटा सामान्य लोकांनी भरला आहे. म्हणजेच कुणीही वर नमूद केलेल्या लिंकवर जावून हव्या त्या बाबींची माहिती फोटोसहित भरू शकतो.

Media Wiki

हे एक सॉफ़्ट्वेअर आहे. जे की सर्व Wikimedia समुह व इतर संकेतस्थळं वापरतात.

लिंक - http://meta.wikimedia.org

 

Wikiquote

यात विविध प्रसिध्द लोकांचे, पुस्तकातील वा चित्रपटातील अवतरणे घेतली आहे. यात म्हणी, वाक्यप्रचार, घोषणा इ चा समावेश आहे.

सुरवात - जुलै २००३

इंग्रजी लिंक – http://en.wikiquote.org/wiki/Main_Page

मराठी लिंक – http://mr.wikiquote.org

 

Wiktionary – शब्दकोश

सुरुवात-डिसेंबर २००२

उपयोग - एका भाषेचा उपयोग करुन सर्व भाषेतील सर्व शब्दाची व्याख्या करणे. आतापर्यंत यात १५० विविध भाषेत ३० लाख शब्द साठा आहे.

इंग्रजी लिंक – http://en.wiktionary.org

मराठी लिंक– http://mr.wiktionary.org.

 

Wikisource

सुरवात - नोव्हेंबर २००३

उपयोग - मोफत व उपलब्ध असलेले कागदे जमा करण्यासाठी सुरु झाला.

लिंक – http://en.wikisource.org/

 

Wikibooks

यामध्ये ई-पुस्तके, विविध भाषा अभ्यासक्रम इ. चा साठा तयार करणे.

लिंक – http://en.wikibooks.org/

 

Wikiversity

सुरुवात - १५ ऑगष्ट २००६

महत्वपूर्ण प्रकल्प आहे. सर्व प्रकारच्या कॉलेजच नव्हे तर कोणत्याही विद्यार्थ्यासाठी याची मदत होऊ शकते. हजारो प्रवेश आहेत.

लिंक – http://en.wikiversity.org/wiki/Wikiversity:Main_Page

 

Wikimedia Commons

सुरुवात- सप्टेंबर २००४

यात मोफ़त छायाचित्रे, नकाशे, व्हिडिओज, अ‍ॅनिमेशन इ. चा समावेश आहे.

लिंक – http://commons.wikimedia.org/

 

Wikispecies

सुरुवात - १४ सप्टेंबर २००४

यात विविध सजीव प्राण्यांबद्दल माहिती आहे. हा प्रकल्प खास करून वैज्ञानिक गोष्टींसाठी आहे. यात लाखो लेख सापडतील.

लिंक – http://species.wikimedia.org/

 

Wikinews

यात विविध बातम्या लिहिता येतात. याचे मुख्य काम म्हणजे बातमीची खात्री करणे व विश्वासार्हता तपासणे.

लिंक – http://en.wikinews.org/wiki/Main_Page

 

मी घेतलेल्या महितीनुसार wiki- वा -pedia या नावाने सुरु आहेत अशा अनेक साईट्स सध्या सुरू आहेत. पण, वरिल १० प्रकल्प सोडून कोणताही प्रकल्प Wikimedia या समूहाचा नाही.

शेवटी मी एवढेच सांगेन की विकिपीडियावर आपले अकाऊंट नक्कीच काढा आणि जास्तीत जास्त माहिती अपडेट करा, वाचा! कारण हे एक मुक्त ज्ञानाचे भांडार आहे. विकिपीडिया राबवत असलेल्या मुलभूत बाबींची तरी व्यवस्थित माहिती व्हावी म्हणून हा लेख लिहिला आहे.

धन्यवाद !!

 

- गोपाल मदने (७०२०५५४४८२)

 

 

Similar News