अभाविपने नक्षलवाद्यांना उघडे केले

Update: 2017-02-28 07:13 GMT

सावित्रिबाई फुले विद्यापीठात उमर खालिद व शेहला रशीदच्या वक्तव्याचा अभाविप ने पुतळा जाळून व नक्षलवाद, दहशतवाद विरोधी घोषणा देऊन निषेध केला. नेहमीप्रमाणे नक्षलप्रेमी डाव्यांनी त्याला विरोध केला. देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेल्या उमर खालिदचा पुतळा जाळणे SFI या डाव्या संघटनेच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्यांनी विद्यापीठाच्या आवारातील अभाविप चे पोस्टर फाडले व त्यावर "अभाविप मुर्दाबाद" असे पोस्टर चिकटवले. त्याचबरोबर नसीर शेख या SFI च्या गुंडाने अभाविपची कार्यकर्ती ऐश्वर्या भणगे हिला शिवीगाळ केली. उमर खालिद या देशद्रोह्याच्या समर्थनासाठी जमलेले डावे आता परिचारक व तावडे चा निषेधासाठी जमल्याच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत.

आजवर जेव्हा केव्हा अभाविपने नक्षलवादाचा आणि दहशतवादाचा निषेध केला तेव्हा विद्यापीठातील डाव्या संघटनांनी याचा उघड विरोध केला आहे. या आधी जेव्हा विद्यापीठात काही संघटनांनी नक्षलवादाचे अभ्यासक देवेंद्र गावंडे यांच व्याख्यान आयोजित केल होतं तेव्हाही यांनी नक्षलवादाचे सत्य सर्वांसमोर येऊ नये म्हणून तो कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर "लेफ्ट राईट लेफ्ट" या नक्षलवादावर टिप्पणी करणारे नाटक सुरु असताना त्यांनी नक्षलवादाचे समर्थान करणाऱ्या घोषणा दिल्या होत्या. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नक्षलवादाचे समर्थन व भारतीय सैन्याचा अपमान करणारी कविता विद्यापीठ परिसरात लावली होती. त्यावर अभाविपने आक्षेप घेत विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली व संबंधितांवर कारवाई ची मागणी केली होती.

या डाव्यांनी वेळोवेळी दहशतवाद्यांच व नक्षलवाद्यांच समर्थन केल आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला घातक असणाऱ्या फुटीरतावादी लोकांचेही यांनी नेहमी समर्थन केलं आहे. नक्षलवादाचं उदात्तीकरण करण्याचे आजवरचे त्यांचे सर्व प्रयत्न अभाविपने हाणून पाडले आहेत. देशाच्या अखंडतेसाठी व समरसतेसाठी अभाविप नेहमीच आम्ही प्रतिबद्ध आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शहरी नक्षलवाद रोखण्याच काम देखील अभाविप नेहमी करेल.

जय हिंद

अक्षय बिक्कड, अभाविप

Similar News