बोगस बियाणे: सोयाबीन च्या उगवण क्षमता का कमी झाली?

Update: 2020-06-27 17:25 GMT

सोयाबीन च्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याची माहिती सरकारला माहिती होती का? शेतकरी सोयाबीन च्या पेरणीसाठी घरातील बियाणं वापरु शकतो का? राज्यात यंदा सोयाबीन चा पेरा का वाढला? या संदर्भात शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केलेले विश्लेषण.

Full View

बोगस बियाणांमुळे सोयाबीन शेतीचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. मराठवाड्यात ७० टक्के तर विदर्भात ५० टक्के गावात सोयाबीनचं पीक घेतलं जातं. त्यामुळे सोयाबीनच्या पिकावर मराठवाडा, विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यंदा सोयाबीन कापणीच्यावेळी पाऊस पडल्यानं त्याचा परिणाम सोयाबीन उगवणशक्तीवर होणार होता. परंतु बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यात विशेष बाब म्हणजे सरकारच्या महाबीज कंपनीचं बियाणंही बोगस असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करायची की पंचनाम्यांची वाट बघत बसायचं? एकंदरित सरकारने आणि शेतकऱ्यांनी अशा वेळी काय केलं पाहिजे सांगतायेत ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया... पाहा हा व्हिडिओ..

Similar News