अशुद्ध ‘भाषा’ म्हणजे काय रे भाऊ ?

Which one is the pure language of the world? What is mean by pure language? भाषेमध्ये शुद्ध, अशुद्ध असे काही प्रकार असतात का? मराठी भाषेचे प्रकार कोणते? संवादासाठी असलेल्या भाषेवर हे कृत्रिम अतिक्रमण का? कशी असावी भाषेची मांडणी? वाचा रविवार विशेष मध्ये लेखक श्रीरंजन आवटे यांचा लेख

Update: 2020-09-13 04:53 GMT

आज लोकसत्तामध्ये बातमी वाचली - कोथरूडमध्ये मुखपट्टी न वापरल्याने २८६ जणांवर कारवाई.

कोथरूडकरांचा असा मुखभंग झाल्याचे वाचून फारच खेद जाहला ! पण मास्कसाठी मुखपट्टी वगैरे शब्द वाचून हसू आलं.

(मागे तर सोशल डिस्टंसिंगला 'साथसोवळं' असा भीषण शब्दही त्यांनी वापरला होता.)

'शुद्ध' आणि 'अतिरेकी' मराठीचा हा आग्रह एका मर्यादेनंतर विनोदी होतो. मुळात शुद्ध आणि अशुद्ध असे भाषेचे प्रकार नसतात. प्रमाण आणि बोली हेच प्रकार आहेत. इथे शुद्धत्वाचा आग्रह हा परभाषेच्या आक्रमणाबाबतचा आहे.

प्रत्येक भाषेत इतर अनेक भाषेतून शब्द येतात, ते आपण सामावून घेण्याने भाषेला कमीपणा येतो, असं नव्हे.

उलटपक्षी, नव्या शब्दांना आपण कशा प्रकारे सामावून घेतो, हे महत्त्वाचं.

मागे एकदा अनुवाद करताना 'टीम' हा शब्द मराठीतही मी आहे असाच ठेवला होता. त्यावर अनुवाद तपासणा-या बाईंनी 'चमू' शब्द वापरण्याची मला सूचना केली होती. टीम हा शब्द मराठीत ब-यापैकी रुळलेला आहे. अशा वेळी चमू हा शब्द वापरण्याने फार काही हशील होतं असं वाटत नाही.

सावरकरांनी भाषाशुध्दीकरता केलेले प्रयोग तर मुसलमानद्वेष्टे आणि परकीय भाषेविषयी आकस असण्यातून केलेले होते.

मराठीपुरता विचार करायचा तर या भाषेच्या जडणघडणीत इतर अनेक भाषांचं योगदान आहे. विश्वनाथ खैरे यांचा 'संमत विचार' (संस्कृत मराठी तमिळ' ) महत्त्वाचा आहे. 'मराठी भाषेचे मूळ', 'द्रविड महाराष्ट्र' यांसारख्या पुस्तकांमधून त्यांनी मराठी भाषेविषयीच्या पारंपरिक आकलनाला छेद देणारी मांडणी केली.

मूळ मुद्दा इतकाच की भाषा संवादासाठी असते. कळावी यासाठी असते. बोलली जाणे ही भाषेची पूर्वअट असते, लिहिली जाणे ही नव्हे. परभाषांकडे शत्रूभावाने पाहणं गैर आहे.

भाषा वाहत्या नदीसारखी आहे. तिच्यावर अशी ही कृत्रिम धरणं बांधून पाणी वळवण्याने फार काही साध्य होणार नाही.

-श्रीरंजन आवटे

Similar News