उद्धव ठाकरे परप्रांतीयांसाठी ट्रेन सोडा, असं सांगत असताना देवेंद्र फडणवीस कुठं होते?

Update: 2020-05-11 09:50 GMT

गेला महिनाभर उद्धव ठाकरे परप्रांतीयांना परत जाण्यासाठी ट्रेन सोडा. म्हणून केंद्राला सतत सांगत होते. तेव्हा फडणवीसांनी आणि केंद्राने काहीही केले नाही. काल मात्र, मी रेल्वेमंत्र्यांशी बोललोय आणि ते दहा गाड्या सोडायला तयार झाले आहेत. असं म्हणत हे माजी मुख्यमंत्री महाशय श्रेय लाटायला पुढे आले. या महिन्याभराच्या उशिरामुळे बिचाऱ्या मजुरांवर जी भयानक परिस्थिती ओढवली. त्याला जबाबदार कोण?

तुमचा राजकारणाचा खेळ झाला पण त्यांचा जीव गेला! फडणवीस, सध्याच्या कठीण काळात तुम्ही प्रत्येक बाबतीत करत असलेले घृणास्पद राजकारण संपूर्ण महाराष्ट्र नीट बघतोय. लोक मूर्ख नाहीयेत. तुमचं प्रत्येक पाऊल तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला गर्तेकडे नेतंय. मला आणि आमच्या नेत्यांना ट्रोल केलं जातंय म्हणत मगरीचे अश्रू ढाळतांना, असं का होतंय. याचा जरा विचार करा. दोन चार भक्त सोशल मिडीयावर कौतुक करू देत, परंतू प्रत्यक्ष गावोगावची परिस्थिती काय आहे? ती तुमच्या 'फुट सोल्जर्स' ना विचारा. ते सांगतील !

तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी महाराष्ट्रातून तुम्ही संपूर्ण पक्षाचा बाजार उठवणार. हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. तुमचे आमदार देखील सध्या खाजगीत तेच बोलतायत. लवकरच उघडपणे देखील बोलायला लागतील. तो दिवस दूर नाहीये. महाराष्ट्राच्या इतिहासात तुमच्या नावाने एक पान निश्चितपणे लिहिले जाईल. परंतू ते काळ्या अक्षरांत असेल ...

उद्य़ जोशी यांच्या फेसबुकवरुन साभार...

Similar News