Canadaतील वयोवृद्धांना भारताकडून मिळतेय Pension!

Canadian Pension Fundsचा भारताशी काय संबंध? कॅनडातील वयोवृद्धांना कशी मिळतेय पेन्शन? जाणून घ्या अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांच्याकडून

Update: 2025-11-22 01:51 GMT

जर तुम्हाला कोणी सांगितले की भारतातील एखाद्या शहरात, Real Estate Investment रिअल इस्टेटमधील चढ्या भावाने घर खरेदी करतांना, देशातील हायवेवर टोल highway Toll भरताना, एखाद्या खाजगी कॉर्पोरेट इस्पितळात मोठ्या रकमेची बिले भरताना…

तुम्ही कॅनडातील Canada एखाद्या म्हाताऱ्याला Senior citizen मिळणाऱ्या Pension पेन्शनमधील वाटा उचलत आहात ? पटेल तुम्हला ? पण यांचा परस्परसंबंध आहे !

गेली अनेक दशके कॅनडातील अनेक म्हाताऱ्या माणसांना नियमितपणे पेन्शन मिळते. हे पेन्शन कॅनडा सरकारचा अर्थसंकल्पातून केला जाणारा कल्याणकारी कार्यक्रम नाही. तेथे खाजगी क्षेत्रातील पेन्शन फंड्स कॅनेडियन म्हाताऱ्या नागरिकांना पेन्शन देतात. कॅनेडियन नागरिक पेन्शन कंपन्यांकडे हप्ता भरतात; तो कॉर्पस कॅनेडियन पेन्शन फंड विविध ठिकाणी गुंतवतात, त्यातून परतावा मिळवतात आणि त्यातून नागरिकांना ठरलेले पेन्शन देतात.

या सगळ्या स्टोरी मध्ये कळीचा प्रश्न आहे; हे पेन्शन फंड गोळा केलेल्या बचती कोठे गुंतवतात आणि त्यातून किती नफा कमवतात. हे कॅनेडियन पेन्शन फंड भारतासारख्या देशात, रियल इस्टेट, पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट इस्पितळे यात मोठ्याप्रमाणावर गुंतवले जात आहेत. साहजिकच घरे / टोल / इस्पितळे यात आपण भरलेल्या पैशातील वाटा त्यांना मिळतो. त्यातून कॅनेडियन म्हताऱ्याना पेन्शन देतात. म्हणून या विषयाचा डायरेक्ट संबंध तुमच्या आमच्याशी आहे !

फक्त खालच्या तीन टर्म्स Google गुगल करा : CPPIB ( Canada Pension Plan Investment Board) ; Ontario Teachers’ Pension Plan आणि CDPQ हे आहेत तीन महाकाय कॅनेडियन पेन्शन फंड्स ;

या तिन्ही कॅनेडियन पेन्शन फंडाची भारतातील गुंतवणूक ३,००,००० कोटी झाली आहे. आणि ती सतत वाढत आहे. हा मुद्दा कॅनडा विरुद्ध भारत असा देखील नाहीये. हा मुद्दा गरीब / विकसनशील देश विरुद्ध विकसित देश असा आहे.

जगातील अनेक विकसित देशातील विविध प्रकारचे फंड उदा. विमा , प्रायव्हेट इक्विटी, हेज फंड, सोव्हेरीन वेल्थ फंड भारत / इतरही अनेक गरीब / विकसनशील देशातील विविध प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत, भविष्यात करणार आहेत. या सर्वाचा भांडवल गुंतवणुकीचा आकडा काढला तर तो काही दशलक्ष कोटी भरेल.

या विविध फंडामध्ये जमा होणारे पैसे / बचती त्या त्या राष्ट्रात तयार होणाऱ्या बचती आहेत. मग प्रश्न असा मनात येईल की या बचती हे फंड आपापल्या राष्ट्रात / अर्थव्यवस्थेत का गुंतवत नाहीत. कारण या विकसित देशांच्या अर्थव्यवस्था थिजलेल्या आहेत. त्यात नवीन भांडवल रिचवण्यास मर्यादा आहेत.

उदा. कॅनडाची / युरोपियन युनियनची GDP जीडीपी गेली अनेक वर्षे अर्धा किंवा एक टक्क्यांहून कमी दराने वाढते. अशा अर्थव्यवस्थांना नवीन भांडवलाची भूकच नसते. मग तेथे तयार झालेले हे भांडवल आपल्या देशाचा वास काढत येते.

अशाप्रकारे आपण घेतलेली घरे / भरलेले टोल / भरलेली बिले यातून या विकसित देशातील पेन्शन, आयुर्विमा, शासनाची तिजोरी आणि तेथील श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यास हातभार लावत असतात.

संजीव चांदोरकर

(लेखक, अर्थतज्ज्ञ)

Similar News