आंबेडकरवादी मिशनने घेतली मुलीच्या लग्नाची जबाबदारी अन् पित्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

Update: 2020-05-27 11:40 GMT

कोरोना (corona) या महासंकटाला आवर घालण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाउन (Lockdown) जाहीर करण्यात आला. 70 दिवसाच्या या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांचे बेहाल सुरु झाले. असंख्य कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली. त्या सर्वांची भूक भागवण्यासाठी आश्रयदाता म्हणून पुढे आलेल्या आंबेडकरवादी मिशन नांदेडचे प्रमुख दीपक कदम यांनी तबल 3,500 कुटुंबियांना घरपोच अन्नधान्य व इतर संसार उपयोगी साहित्य पुरविले. कसल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गोरगरिबांची चूल पेटली पाहिजे, त्यांची भूक भागावी म्हणून 70 दिवस झाले सर कष्ट घेत आहेत.

मंगळवारी दीपक कदम सर मिशनमध्ये अभ्यासिकेत बसले होते. मिशनमध्ये सफाईकामगार असलेल्या संजय मोकलवाड हा पुढे आला अन् काहीच न बोलता अश्रू गाळू लागला. थोडा वेळ काय झाले कोणालाच कळले नाही. सरांनी त्याला धीर देत विचारले तर तो म्हणाला, मुलीचे लग्न अडलं आहे. 3 जूनची काढलीय. घरात काहीच नाही. पाहुणे म्हणतायत 50 जणांच्या उपस्थितीत लग्न लावू.

कदम सर म्हणाले काही काळजी करायची नाही. लग्नासाठी लागणारे धान्य, कपडे आणि दागिन्यांचा खर्च आंबेडकरवादी मिशन करेल, तू कामाला लाग. लगेच त्यावेळी त्याच्या घरी धान्य पाठवले आणि इतर खर्चासाठीचा धनादेश संजय आणि त्याच्या पत्नीच्या हातात सुपूर्द केला.

डबडबत्या डोळ्यांनी मिशनमध्ये आलेल्या सफाईकामगार आनंदअश्रू गाळात बाहेर पडला. महत्वाचे म्हणजे आंबेडकरवादी मिशन उभारलेल्या मुलांच्या वसतिगृहाचे लोकार्पण कोणत्याही तथाकथित बुद्धिजीवी अथवा राजकीय लोकांना न बोलावतात याच संजयच्या हस्ते करून एक नवा पायंडा कदम सरांनी घालून दिला होता.

सर आपल्या सामाजिक बांधिलकी आणि गरिबांचे अश्रू पुसण्याच्या कार्याला मानाचा जय भीम

Similar News