कितने सपने कितने अरमां लाया हूँ मैं...

Update: 2020-01-05 10:03 GMT

जर माझ्या सेवानिवृत्तीची वेळ येत असेल तर मला एकट्याला चहाच्या टपरीवर चहा पिण्याची सवय लावायची आहे. जर जगाने माझं म्हणणं मान्य केलं असतं तर भारतातील कोणतंही चॅनल त्यांनी पाहिलं नसतं. चॅनलचं कनेक्शन आपल्या घरातून काढून टाकलं असतं. पण ठीक आहे. मी कमीत कमी तुम्हाला सांगितलं तरी. की भारतीय टीव्ही चॅनल पाहू नका.

मित्रांनो, आज दुपारी काही वेळ मी पुस्तक घेण्यासाठी बाजारात जात आहे. माझ्या पुस्तकासाठी नाही तर इतरांच्या पुस्तकांसाठी. मी एक नवीन गोष्ट सुरू केली आहे. मी जेव्हा जेव्हा राजकमलला (पुस्तक विकत घेण्याचे ठिकाण) जातो. तेव्हा मी मला माहिती असलेली चांगली पुस्तक वाचकांना सुचवतो. माझ्या फेसबुकवर मला बरेच प्राध्यापक आहेत.

त्यांच्या टाइमलाईन वरून असं दिसून येतं की, जगात फक्त एकच पुस्तक लिहिले गेले आहे आणि त्या प्राध्यापकांनी ते लिहिले आहे. त्याच्यानंतर कोणतंही पुस्तक लिहिलं गेलं नाही. मी अशा चांगल्या आणि सक्षम लोकांना अनावश्यक आणि कमी प्रामाणिक मानतो. ते इतर पुस्तकांची नावे घेतच नाहीत.

ndtv

आपण सर्वांनी ज्ञान एकमेकांना सांगितलं पाहिजे. त्यामुळं आज मी इतर लेखकांच्या पुस्तकांसाठी येत आहे. एकदा मी माइक घेऊन वाचकांना ओमप्रकाश वाल्मीकी यांचे पुस्तक वाचण्यास सांगितले. जर आपण हे काम इतर हिंदी लेखकास सांगितले की तुम्ही वाचकांना चांगली पुस्तक वाचण्यासाठी मदत करा.

तर ते दुसऱ्यांच्या पुस्तकाचं नाव घेणारच नाहीत. माफ करा, पण हे खरं आहे. जीवनातील असुरक्षितेतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वत:च्या असुरक्षिततेतून बाहेर पडावं लागेल.

राजकमल प्रकाशन ला आम्ही आपल्या अड्ड्याला (वाचण्याचे ठिकाण) ‘जलसा घर’ असं नाव दिले आहे. हॉल क्रमांक 12-ए स्टॉल क्रमांक 255-280. त्यानंतर मी माझ्या इंग्रजी प्रकाशक ‘द स्पीकिंग टायगरच्या स्टॉलवर जाईन. हॉल क्रमांक 10, स्टॉल क्रमांक -103-107 जिथं माझं इंग्रजी पुस्तक the free voice आहे. माझं पुस्तक अनेक लोकांनी अगोदरच खरेदी केलं आहे. मात्र, काही लोकांनी त्यावर सही मागितली आहे.

ndtv

 

त्यामुळं या मात्र, माझ्यासाठी काहीही गुलाब, कॅलेंडर असं काही घेऊन येऊ नका.

मी जास्त बोलू शकणार नाही. मात्र, या गर्दीतही काही लोक आपल्या समस्या सांगू लागतात. मात्र, त्यावेळेला माझं लक्ष सारखं विचलित झालेलं असतं. नंतर मी ही नाराज होतो. आणि ते ही दु:खी होतात. त्यानंतर त्यांना माझ्याकडून देखील त्रास होतो. कारण ते या ठिकाणी ते येताना आपल्या समस्य़ांची मोठी फाईल घेऊन येतात.

आणि या समस्याचं ओझं घेऊन मी चालू शकत नाही. मला तुमचं प्रेम हवं आहे. तुम्ही मला खूप काही दिलं आहे. आता या खजाना तुम्ही नवीन आणि माझ्या पेक्षा चांगल्या असलेल्या पत्रकारांना द्या. जर माझ्या सेवानिवृत्तीची वेळ येत असेल तर मला एकट्याला चहाच्या टपरीवर चहा पिण्याची सवय लावायची आहे.

जर जगाने माझं म्हणणं मान्य केलं असतं तर भारतातील कोणतंही चॅनल त्यांनी पाहिलं नसतं. चॅनलचं कनेक्शन आपल्या घरातून काढून टाकलं असतं. पण ठीक आहे. मी कमीत कमी तुम्हाला सांगितलं तरी. मी नापास झालो तर झालो. मी कुठं आयआयटी टॉपर होतो. तसंही, अनेकांनी टीव्ही पाहणं बंद केलं आहे. त्यांचे आभार.

Similar News