मॅक्समहाराष्ट्र चे यूट्युब चॅनल हॅक !

Update: 2019-11-09 17:54 GMT

आज मॅक्समहाराष्ट्रचं यूट्युब अकाऊंट हॅक आणि डिलीट करण्यात आलंय. आज साधारण 8 वाजता हे अकाउंट हॅक करण्यात आलं. तर MaxMaharashtra चे हिंदी व्हिडीओ अपलोड करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या MaxMaharashtra Hindi या अकाउंटवर Porn Video अपलोढ करण्यात आले आहेत. त्यामुळं या चॅनेल ला देखील यूट्युबने कॉपी राईट पाठवला आहे. त्यामुळं आता हे चॅनेल देखील यूट्यूब कडून बंद केलं जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील अनेक लोकांनी मॅक्समहाराष्ट्राचे व्हिडीओ दिसत नाही. असं फोन करुन कळवलं आहे. आम्ही सर्व प्रेक्षकांना विनंती करतो. की, तुम्ही पुढील व्यवस्था होईपर्यंत मॅक्समहाराष्ट्र चे सर्व व्हिडीओ मॅक्समहाराष्ट्र च्या फेसबुक पेजवर पाहू शकतात. तुमच्या शुभेच्छा मॅक्समहाराष्ट्रसोबत कायम आहेत. असाच लोभ कायम राहावा... आपण पुन्हा एकदा उभा राहू...

आपला नम्र

रवींद्र आंबेकर

मुख्य संपादक, मॅक्समहाराष्ट्र

Full View

Similar News