MaxMaharashtra Hack : व्यवस्थेविरोधात उठवणाऱ्या आवाजाची मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही – धनंजय मुंडे

Update: 2019-11-10 08:40 GMT

मॅक्समहाराष्ट्रचं यूट्युब अकाऊंट हॅक आणि डिलीट करण्यात आलंय. या संदर्भात राज्यातील मॅक्समहाराष्ट्रा च्या वाचकांसह राजकीय प्रतिनिधींनी हे अकाउंट हॅक झाल्य़ाबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मॅक्समहाराष्ट्र चं युट्यूब अकाउंट हॅक केल्यानंतर ट्विट्रर वर प्रतिक्रिया दिली आहे.

तुटपुंज्या भौतिक सुविधा घेऊन रविंद्र आंबेकर यांनी मॅक्समहाराष्ट्र ही चळवळ उभी केली होती. व्यवस्थेविरोधातला मजबूत आवाज बनलेल्या मॅक्स महाराष्ट्र या वृत्तसमूहावर सायबर हल्ला करून ते बंद पाडल्याची बाब गंभीर आहे. व्यवस्थेविरोधात उठवणाऱ्या आवाजाची मुस्कटदाबी आता सहन केली जाणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया मुंडे यांनी ट्विटर दिली आहे.

दिनांक 9 नोव्हेंबर 2019 ला 8 वाजता हे अकाउंट हॅक करण्यात आलं. तर MaxMaharashtra चे हिंदी व्हिडीओ अपलोढ करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या MaxMaharashtra Hindi या अकाउंटवर Porn Video अपलोढ करण्यात आले आहेत. त्यामुळं या चॅनेल ला देखील यूट्युबने कॉपी राईट पाठवला आहे. त्यामुळं आता हे चॅनेल देखील यूट्यब कडून बंद केलं जाण्याची शक्यता आहे.

Similar News