नव्या राजनैतिक सुत्रपाताचा प्रारंभ करणारी कविता

Update: 2020-05-15 08:13 GMT

एका मागोमाग मजुरांविषयी घडणाऱ्या घटनेने मन हेलावून निघत होते. मी देखील त्यांच्या या दुर्दशे बद्दल अस्वस्थ झाले होते, पण ज्या मजुरांची आपण इतकी कीव करतो आहोत, त्यांनी आपल्या विकासाला गती दिली आहे. आपले घर बांधले आहे, माझ्या घराची वीट न वीट त्यांनी रचली आहे. आपण खात असलेले अन्न ज्या जमिनीत उगते, ती जमीन देखील याच मजुरांनी कसलेली आहे.

जो मजूर माझा देश घडवतो त्याच्याकडे मी सहानुभूतीने पाहते ही शोकांतिका आहे. सहज विचार केला की, आज जर मला घर नाही म्हणून मी रस्त्यावर आले, तर इतके मैल पायी चालण्याचे धाडस मी करू शकेन का? उत्तर आहे नाही. पण जगण्याचा ही हक्क गमावून बसलेल्या मजुरांना मात्र शक्य आहे. मग ती आठ महिन्याची गर्भवती ही का असेना, तिला ही शक्य आहे. कारण ते तुम्हा आम्हा सारखे व्यवस्थेला - सरकारला शरण जाणारे नाही आहेत. उपाशी राहतील, एकवेळ मृत्यू पत्करतील पण भीक मागणार नाही ही निष्ठा आहे त्यांच्या ठायी.

परिवर्तनवादी, पुरोगामी असलेले बुद्धिवादी आज सगळेच रस्त्यावरून चालणाऱ्या मजुरांविषयी बोलताना त्यांच्याकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहतात, पण त्याचं बंड पुकारणे हे लोकतंत्र निर्माण करण्याचा इतिहास रचणार! ही दृष्टी रंगचिंतक मंजुल भारद्वाज सरांनी त्यांच्या कवितांमधून दिली.

मंजुल भारद्वाज सरांना ही त्रास झाला, अस्वस्थ वाटलं पण आपणही या

अवस्थेत केवळ हळहळ व्यक्त केली तर, प्रश्न सुटणार नाहीत हे त्यांना जाणवले.

म्हणूनच त्यांनी मजुरांच्या पायी चालत जाणाऱ्या घटनेला 'महात्मा गांधीच्या दांडीमार्च' सोबत जोडले आणि गांधींच्या तत्वाची दिशा दिली शेवटच्या (व्यवस्थेतील अंतिम) व्यक्तीला जोडण्याची.

अंतिम व्यक्ति लोकतंत्र की लड़ाई लड़ रहा है!

- मंजुल भारद्वाज

भारतीय समाज और व्यवस्था का

अंतिम व्यक्ति चल रहा है

वो रहमो करम पर नहीं

अपने श्रम पर

ज़िंदा रहना चाहता है

व्यवस्था और सरकार

उसे घोंट कर मारना चाहती है

अपने टुकड़ों पर आश्रित करना चाहती है

उसे खोखले वादों से निपटाना चाहती है

अंतिम व्यक्ति का विश्वास

सरकार से उठ चुका है

उसे अपने श्रम शक्ति पर भरोसा है

जब भगवान, अल्लाह के

दरबार बन्द हैं

उनकी ठेकेदारी करने वाली

यूनियन लापता हैं

तब अंतिम व्यक्ति ने

अपनी विवशता को ताक़त में बदला है

मरना निश्चीत है तो

स्वाभिमान से जीने का संघर्ष हो

अंतिम व्यक्ति अपनी मंज़िल पर चल पड़ा है

वो हिंसक नहीं है

पुलिस और व्यवस्था की हिंसा सह रहा है

मुख्य रास्तों की नाका बन्दी तोड़

नए रास्तों पर चल रहा है

उसके इस अहिंसक सत्याग्रह ने

सरकार को नंगा कर दिया है

सोशल मीडिया, ट्विटर ट्रेंड के

छद्म को ध्वस्त कर दिया है

गोदी मीडिया को 70 महीने में

पहली बार निरर्थक कर दिया है

अंतिम व्यक्ति का

यह सविनय अवज्ञा आंदोलन है

लोकतंत्र की आज़ादी के लिए

वो कभी भूख से मर रहा है

कभी हाईवे पर कुचला जा रहा है

कहीं रेल की पटरी पर मर रहा है

पर अंतिम व्यक्ति चल रहा है

जब मध्यम वर्ग अपने पिंजरों में

दिन रात कैद है

तब भी यह अंतिम व्यक्ति

दिन रात चल रहा है

सरकार को मजबूर कर रहा है

अपनी कुर्बानी से मध्यम वर्ग के

ज़मीर को कुरेद रहा है

ज़रा सोचिए देश बन्दी में

यह अंतिम व्यक्ति लोकतंत्र के लिए

लड़ रहा है

यह गांधी की तरह

अपनी विवशता को

अपना हथियार बना रहा है

शायद गांधी को पहले से पता था

उसके लोकतंत्र और विवेक का

वारिसदार अंतिम व्यक्ति होगा!

हा लॉकडाऊन आपल्याला काय देऊन जातोय हे समजायला हवं... आतापर्यंत आपण बाहेरच्या जंजाळात होतो, virtual गोष्टींचा भाग होतो, अडकत होतो. आपण माणूस आहोत हे विसरून मशीन होत चाललो होतो...एका निमित्ताने सगळंच जिथल्या तिथे थांबलंय. हो, ही आपल्या व्यवस्थेची दुर्दैवी बाब आहे की गरिबांचे शोषण, महिलांचे 24 तास राबणे आणि कामगारांची पायपीट जैसे थै आहे.

पुढे येणारा काळ आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे, हे आजच्या स्थितीत डोकावून पाहिले तर कळेल, हे निश्चित.सध्या तरी मी घरी आहे, पण ज्यांना आपल्या घराची ओढ लागली आहे, त्यांचा खडतर मार्ग निदान सुसह्य व्हावा.

व्यवस्थेला बळकट करणाऱ्या या मजुरांनी आपल्या पायी चालत जाण्याच्या संघर्षातून, हे निश्चितपणे सांगितले आम्ही गरीब असलो तरी लाचार नाही, आमच्यात आयुष्याला श्रमाने घडवण्याचे कौशल्य आहे. जिथे मध्यमवर्ग आज आपल्याच चौकटीत कैद आहे, सुखवस्था आणि सुरक्षा यातच बंदीस्त आहे. तिथे आपल्या विवशतेला ताकद करून, नवीन रस्ता शोधत, गांधीच्या अहिंसेचा मार्ग या मजुरांनी निवडला आहे.

आपल्याकडे आकाशातून पुष्पवृष्टी करून कितीतरी मुद्दे नजरेआड करून त्या झाकल्या जातील असे वाटते, पण या फुलांच्या पाकळ्यावरून पायी चालणाऱ्यांना ना थांबवू शकत, ना दिलासा देऊ शकत... त्यांच्या पायांच्या खुणा येणाऱ्या काळात साक्ष असणार आहेत भावी भारताच्या निर्माणाची!

जिथे शब्द अर्थहीन होत चालले आहेत, संवेदना मेल्या आहेत, लोकशाही ची अंत्ययात्रा निघाली आहे, तिथे एक रचनाकार, एक कवी मजुरांच्या संघर्षाला एक नवीन राजनैतिक आयाम देऊन लोकतंत्र आणि लोकशाहीच्या प्रक्रियांना आपल्या रचनेच्या माध्यमाने पेटवतो. शब्द किती लिहिलेले आहे ते महत्त्वाचे नाही, पण शब्दात काय लिहिले आहे हे महत्त्वाचे आहे. आणि हेच रचनाकाराचे असणे आहे, हेच त्याच्या रचनेचे विधान आणि संविधान आहे. आणि जिथे माणुसकी संपते तिथे तिला जिवंत करण्यासाठी हे कला साहित्याचे नवीन रूप आपल्या समोर येऊन काळाला नवीन आकार देते.

क्रांति का परचम फहरा गए

- मंजुल भारद्वाज

खुद चले

और ऐसा चले

बंद देश चल पड़ा

हालात से समझौता नहीं किया

क़ुर्बानी दे दी

कुर्बान होकर चल पड़े

ऐसे चले

मुर्दा देश में

कारवां चल पड़ा

सच है

जब वो चल देते हैं

जब वो ठान लेते हैं

उनकी प्रतिज्ञा ही

उनका विधान होता है

सर्दी, गर्मी, बरसात

दिन रात का अँधेरा उजाला

उन्हें डिगा नहीं पाता

उन्हें डिगाने वाला

डिग जाता है

उन्होंने सत्ता के सूरमा को

डिगा दिया

सत्ता की बुनियाद हिला दी

अब उसे गिरते हुए

दुनिया देखेगी

कोई भगवान का मंदिर

कोई धर्म का जाल

कोई पूंजीपति बचा नहीं पायेगा

वो अपने खून से संविधान में

प्राण फूक गए

वो लोकतंत्र को ज़िंदा कर गए

संघर्ष की नई मिसाल बन

युगों युगों तक क्रांति का

परचम फहरा गए !

सायली पावसकर, रंगकर्मी

संपर्क : pawaskarsayali31@gmail.com

Similar News