सूर्यग्रहण आणि कोरोनाचा संबंध आहे का?

Update: 2020-06-20 10:04 GMT

या दशकातले शेवटचे कंकणाकृती सूर्यग्रहण दि. २१ जून २०२० रोजी म्हणजे रविवारी दिसणार आहे. सूर्यग्रहण हा

सावल्यांचा खेळ आहे आणि तो एक खगोलीय आविष्कार असतो. त्यामुळे सूर्यग्रहण पाहू नये, त्यामुळे नुकसान होते अशा अंधश्रद्धा बाळगू नये असे आवाहन खगोलशास्त्रज्ञ कायम करत असतात.

रविवारीचे सूर्यग्रहण हे उत्तर भारताच्या राजस्थान ते उत्तराखंड या दरम्यान कंकणाकृती तर उर्वरित भारतामधून खंडग्रास दिसणार आहे. महाराष्ट्रात सूर्य ५०% पेक्षा जास्त झाकलेला दिसेल. ग्रहण साधारण १०.०० वाजता सुरू होऊन दुपारी १.३५ वाजता संपेल. योग्य काळजी घेऊन ग्रहण नक्की पहावे. भारतातील यापुढील कंकणाकृती सूर्यग्रहण २०३१ साली दिसणार आहे

-सारंग ओक

खगोलशास्त्रज्ञ आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक

Similar News