नेटफ्लिक्स, डिस्नेचा हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राईम पाहताय मग नक्की वाचा…

Update: 2019-12-08 05:04 GMT

जागतिक कॉर्पोरट भांडवलशाहीचे बिनीचे पथक : नेटफ्लिक्स, (Netflix) डिस्नेचा हॉटस्टार (hotsta) आणि अॅमेझॉन प्राईम भारताची लोकसंख्या, त्यातील अर्धी लोकसंख्या ३५ वर्षाखालील असणे. जवळपास प्रत्येक तरुणांच्या हातात स्मार्टफोन असणे (नसेल तर पुढच्या काही महिन्यात येईल) आणि तरुणांकडे भरपूर वेळ असणे.

या सर्वामुळे जागतिक ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपन्या भारतातील हे मार्केट ताब्यात घेण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. २०२२ पर्यंत ८५ कोटी स्मार्टफोन धारक ऑनलाईन व्हिडीओ बघतील असा अंदाज आहे. या क्षेत्रात सध्या ३५०० कोटींचा धंदा होतोय. तो २०२२ पर्यंत दहा पटींनी वाढून ३५,००० कोटी रुपये होईल असे अंदाज आहेत. भारताशी संबंधित कंटेंट टायर करण्यासाठी नेटफ्लिक्स ३००० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.

हे ही वाचा...

कोल्हापूरच्या विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा होणार?

Big News : बाळासाहेब ठाकरे स्मारक वाद, एकही झाडं तोडलं जाणार नाही – महापौर

BIG NEWS : पक्षात राहायचं का नाही याचा विचार करावा लागेल – एकनाथ खडसे

तरुणांना आवाहन :

याचा जास्तीत ग्राहक वर्ग तरुण तरुणी असणार आहेत. कोणतंच कंटेंट व्हॅल्यू न्यूट्रल नसते; त्यात काहीतरी सटल सामाजिक/ राजकीय मेसेज असतो. दरवेळी हा मेसेज डावा-उजवा, प्रस्थापित-क्रांतिकारी, काळा-पांढरा असा असतो असे काही काही नाही.

पण तुम्ही काय खाता/ पिता यावर तुमची शारीरिक तब्येत ठरते; तसेच तुम्ही काय वाचता / बघता / चर्चा करता यावर तुमची मानसिक- वैचारिक तब्येत ठरते. मी स्वतः नेटफ्लिक्स; प्राईम बघतो. काहीच वाईट नाही. फक्त चोखंदळ राहा आणि मनाच्या भोवती तटबंदी उभारा. कोणीच तुमच्या इच्छेविरुद्ध तुमच्या मनाच्या हार्डडिस्क वर काही सेव्ह करता कामा नये खूप काही घडू पाहतंय; खूप काही घडणार आहे.

Similar News