कोरोना नंतरची अर्थव्यवस्था...

अमेरिका चीनमध्ये शीतयुद्ध होऊ शकेल का? जगाच्या पाठीवर चीन का आक्रमक होत आहे? राष्ट्रांमध्ये स्वसंरक्षणात्मक आर्थिक नीती का वाढत आहे का?

Update: 2020-09-30 12:05 GMT

युनायटेड नेशन्स स्थापनेला मागच्या आठवड्यात ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यासाठी झालेल्या विविध कार्यक्रमावर कोरोनाचे काळे ढग होतेच; पण कोरोनोत्तर काळात जगाची संरचना नक्की कशी असणार याबद्दलचा संभ्रम अधिक गडद होत चालला आहे.

राष्ट्रमागून राष्ट्रे स्वसंरक्षणात्मक आर्थिक नीती आणतील, गेल्या चाळीस वर्षाच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसेल, डब्ल्यूटीओ विकलांग होईल, अमेरिका चीनमध्ये शीतयुद्ध होऊ शकेल. अशा अनेक गोष्टी येत्या काही महिन्यात अगोदरच होतील.

या सगळ्या गदारोळात ठळक गोष्ट जर कोणती असेल तर…

अमेरिका आणि इतर भांडवली राष्ट्रे जागतिकीकरणाला छेद देणारी म्हणून पुढे येत आहेत. आणि चीन मिळेल त्या जागतिक व्यासपीठांवर जागतिकीकरण किती चांगले आहे. जागतिक व्यासपीठे का जिवंत राहिली पाहिजेत. यावर मोठया मोहिमा काढत आहे.

(काल हिंदू ग्रुपच्या दैनिकात चीनने पानभर जाहिराती छापल्या आहेत)

अजून एक: कोरोनोत्तर जागतिक अर्थव्यवस्थेत अजून एक देश वेगाने जागतिकीकरणाचा लाभार्थी म्हणून अजून एक कम्युनिस्ट देश पुढे येत आहे.

व्हियेतनाम !

याचे अन्वयार्थ लावल्याशिवाय आपल्यातील चर्चा पुढे जाऊ शकणार नाहीत

-संजीव चांदोरकर (२९ सप्टेंबर २०२०)

Similar News