बेयर ग्रील्स vs मोदी

Update: 2019-07-30 16:46 GMT

"मॅन vs वाईल्ड " हा डिस्कवरी चॅनलवर बऱ्याच वर्षांपासून चालत असलेला लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये बेयर ग्रील्स हा माजी ब्रिटिश आर्मी ऑफिसर मानवी अस्तित्वास अतिशय प्रतिकूल अशा भौगोलिक भागात पोहोचतो आणि तिथे कुठल्याही साधनांशिवाय किंवा मदतीशिवाय survival करण्याच्या टेकनिक्स दाखवतो.

तो कधी सहारा वाळवंतात पाण्याविना अनेक दिवस काढतो. अन survival साठी स्वतःचे मूत्रही पितो, कधी आफ्रिकेतील घनदाट जंगलात जाऊन विषारी सापांपासून बचाव कसा करावा ते सांगतो आणि त्यांना कसे फाडून खायचे ते शिकवतो? कधी शरीर गोठवणाऱ्या बर्फाळ आर्क्टिक नदीला नग्नावस्थेत पार करतो, कधी सायबेरियातील बर्फ़ाळ प्रदेशात मेलेल्या याकचे रक्त पितो, कधी आफ्रिकेच्या निबीड जंगलात राहून कच्चे मांस खातो, कुठल्याही साधनाविना, मिळेल त्या साधनांवर जीव कसा वाचवावा? आग कशी पेटवावी, जंगली श्वापदांचा सामना कसा करावा? ते तो दाखवतो, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत स्वतः चा जीव वाचवून नंतर तेथून सुटका करणे असा त्याच्या शो चा format आहे.Adventure ची आवड असणारे माझ्यासारखे बेयर ग्रील्सचे जगभरात करोडो फॅन्स आहेत. तर या बेयर ग्रील्सची लोकप्रियता बघून मोदींनी देखील त्याच्यासोबत उत्तराखंडातील कॉर्बेट अभयारण्यात एक एपिसोड शूट केला. जो येत्या 12 ऑगस्टला डिस्कव्हरी चॅनेलवर दाखवण्यात येईल. गौरतलब बात ये है की, या शोमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा देखील एका एपिसोड मध्ये दिसले होते.

130 करोड लोकसंख्या असलेल्या या देशाचे मार्केट ट्रॅप करण्यासाठी फॉरेन एंटरटेनमेंट चॅनल्स आसुसलेले आहेत. प्रत्येक देशातील प्रेक्षकांची नाडी ओळखून त्यांच्या राष्ट्रभाषेत ते प्रोग्रॅम्स प्रसारित करतात. म्हणूनच हल्ली डिस्कव्हरी, हिस्ट्री, कलर्स इन्फिनिटी, सोनी मॅक्स, स्टार स्पोर्ट्स इत्यादी चॅनेल्स हिंदीत प्रक्षेपण करायला लागली आहेत.

"मॅन vs wild "ची viewership वाढविण्यासाठी त्यांना मोदी मिळत आहेत आणि adventure करण्याची खुमखुमी म्हणा किंवा 180 देशातील प्रेक्षकांसमोर टेम्भा मिरविण्याच्या हव्यासापोटी म्हणा, मोदी या शोचा वापर करणार आहेत.

या शोच्या शूटिंग दरम्यानच्या काळात म्हणजे फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे 40 सैनिक शाहिद झाले होते पण शूटिंग गुप्तपणे अखंड सुरू राहिले असे सांगितले जात आहे.

"मॅन vs वाइल्डचा " हा एपिसोड बघतांना "मॅन " कोण आणि "वाईल्ड" कोण असा प्रश्न मात्र सर्वांना नक्कीच पडेल.

"जयश्री इंगळे"

#ManVersesWild

Similar News