'हलकट डावे अन् समाजवादी'

Update: 2018-03-07 10:53 GMT

डाव्यांवर 'व्यक्तिगत:' राग असण्याची कारणं

1 - हे लोक दुसऱ्याच्या बुद्धिमत्तेचा अजिबात आदर करत नाहीत. म्हणजे तुम्ही भलेही उजवे किंवा उजवीकडे झुकणारे नसाल पण डाव्यांच्या मताशी सहमत नसणाऱ्यांना तुच्छ लेखणं हा डाव्यांचा जन्मजात गुण. माझ्या निरीक्षणात हे अनेकदा आलंय की डाव्यांच्या बुद्धिमत्तेचा उजव्यांकडून आदर केला जातो पण डाव्यांकडून उजव्यांच्या बुद्धिमत्तेची नेहमीच खिल्ली उडवली जाते. ब्रह्मदेवानं सारी अक्कल आम्हालाच दिलीय आणि बुद्धिवादी, प्रवर्तक चळवळ ही फक्त आमची ठेकेदारी आहे असं मानणारा हा वर्ग. अनेक उजवीकडे झुकलेले अभ्यासू, हुशार आणि खऱ्या अर्थानं पक्षपाती नसणारे लोक या डाव्यांमुळं कट्टर उजवे झालेत. म्हणून डावे लोकशाहीसाठी घातक.

2 - मुळात बुद्धिवाद आणि डावे हे समीकरण ठरवणारेही तेच. इतर वैचारिकदृष्ट्या पंगू आणि अपूर्ण हे ठरवणारेही तेच. यांच्या थोतांडाला मानत नसाल तर कथित वैचारिक कंपूतून हद्दपार करण्याचे अधिकारही यांनाच. थोडक्यात वैचारिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आधुनिक ब्राह्मणी-मनुवादी व्यवस्थेचे निर्माते असं डाव्या आणि समाजवादी लोकांना म्हणायला हरकत नाही. सध्या महान-स्वघोषित-सेल्फ अटेस्टेड-वैचारिक डिझायनर पुरोगामी त्यांचा कित्ता पुढे गिरवतायंत.

3 - असं म्हणतात की अत्यंत हालाखीची, गरीबीची, अन्यायाची, विषमतेची परिस्थिती असते तिथे डावी चळवळ रुजते आणि रुपडं पालटवून टाकते. चूक. भोळ्या कामगारांना-शेतकऱ्यांना रक्तरंजित क्रांतीसाठी भडकवून सत्तापालट करणे अन् मग समाजवादाच्या नावाखाली त्यांनाच देशोधडीला लावणे हा आजपर्यंतच्या डाव्या चळवळीचा इतिहास राहिलाय. रशियानं एक Failed Ideology म्हणून डाव्या विचारसरणीचा त्याग 1991 नंतर तातडीनं केला तो याचसाठी. (गोर्बाचेव्हचं 'ते' भाषण वाचताना अंगावर काटा येतो) डावे हे स्वत:ला कामगार आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवतात. पण परिस्थिती एकदम उलटी आहे. तरीही इथे नमूद करतो की आपल्या देशातील आणि परदेशातीलही असे अनेक निस्सीम आणि परिवर्तनावर विश्वास असणाऱे निवडक डावे हे कामगार अन् शेतकरी वर्गासाठी खरंच रक्त आटवतात अन् जीव ओवाळून टाकतात. पण असे फार निवडक आहेत. त्यांच्याविषयी आदर.

आता सगळ्यात महत्त्वाचं -

त्या लेनिनचा पुतळा उखाडल्यानं घंटा फरक पडणार नाहीये. सोव्हिएत रशियाची शकलं झाल्यानंतर त्या शकलांच्या अनेक भागात लेनिनचे पुतळे फोडले, तोडले, पाडले गेले. घंटा त्याचा विचार काही रुजला नाही. उलट जास्तीत जास्त हद्दपारच झाला. काही जिहादी डावे, भ्रमित-भरकटलेले समाजवादी आणि सेल्फ अटेस्टेड पुरोगामी असं म्हणतायंत की कालपर्यंत कोणाला माहित नसलेला लेनिन आज सर्वसामान्यांपर्यंत पोहचलाय. त्याचे विचार तळागाळापर्यंत पोहचलेत. लेनिन हा लाखोंचा हत्यारा होता असा आरोप करणं अतिशयोक्ती ठरेल पण तो 100 टक्के हिंसेचा समर्थक होता, रक्तरंजित क्रांतीचा प्रणेता होता हे नक्की. दुटप्पी, धोरणी पुरोगाम्यांकडून लेनिन हा खलनायक नव्हता वगैरे वगैरे फेकलं जातंय. मान्य की स्टॅलिनपेक्षा लेनिन क्रूर नव्हता पण स्टॅलिनला अनेक बाबतीत फ्री हँड लेनिनंच दिला होता. नंतरच्या काळात स्टॅलिन हाताबाहेर जायला लागल्यावर पक्षशिस्तीचं कारण देत स्वत:ला लेनिनने सेफ करुन घेतलं. बोल्शेव्हिक क्रांतीच्या टप्प्यातील प्रत्येक सूक्ष्म घटना पाहता लेनिनला अहिंसावादी म्हणायची हिंमत एकही डावा-समाजवादी-सेल्फ अटेस्टेड पुरोगामी करणार नाही. (कालसापेक्षतासारखा भंगार मुद्दा अजिबात मांडू नका) झारशाहीविरोधातला राग झारच्या कुटुंबावर- झारच्या बायकोवर-कोवळ्या मुलांवर का काढला? त्यांची निर्घृण हत्या का केली ? मृत्यूनंतर त्यांच्या शरीराची विटंबना का केली गेली ? तत्वनिष्ठ डावे कायद्याच्या मार्गानं झारच्या कुटुंबाला फाशी देऊ शकत नव्हते ? हद्दपार करु शकत नव्हते ? त्याला लेनिनची मूकसंमती होती की लेनिन तेव्हा पिक्चरमध्येच नव्हता की या हत्याकांडात लेनिनच सर्वस्वी होता याचं उत्तर एकही डावा-समाजवादी-सेल्फ अटेस्टेड पुरोगामी देणार नाही. असोत लेनिन काय, स्टॅलिन काय ते कळूदेत लोकांना.. डाव्यांची हुकूमशाही, रक्तरंजित इतिहास, कामगार-शेतकऱ्यांना यांनी कशाप्रकारे देशोधडीला लावलं, शैक्षणिक-वैचारिक क्षेत्राची फोल ठरलेली ठेकेदारी या गोष्टीही लख्खपणे उजेडात येतील. आणल्याही जातील.

डाव्यांवरचा राग हा वैचारिक अजिबात नाही. 100 टक्के व्यक्तिगत आहे आणि तो तसाच राहिल. कारण डावे आणि विचार हेच समीकरण मला मान्य नाही आणि त्याला जबाबदारही डाव्यांचं पदोपदी तुच्छ लेखणंच आहे. ते तुमच्या बुद्धिमतेची, अनुभवांची, परिश्रमांची खिल्ली उडवतात मग तुम्ही तरी त्यांचा आदर का करायचा ? फाट्यावर मारा त्यांनाही आणि त्यांच्या आदर्शांनाही.. ही प्रतिक्रियावादी विचारसरणी डाव्यांमुळंच विकसित झालीय हे वेगळं सांगायची गरज नाही. डाव्यांवरचा राग हा पूर्णपणे व्यक्तिगत आहे आणि तो डाव्यांच्या वर्तनात सुधारणा होणार नाही तोपर्यंत तसाच राहणार! लेनिनचा पुतळा हे डाव्यांच्या हेकेखोरगिरी, दुटप्पीपणा, साळसूदपणा, दादागिरीचं, गुरमीचं, उन्मादाचं प्रतिक आहे अन् तो उलथवला गेला असं मी मानतो. हा पुतळा पडला तेव्हा काय चुत्यागिरी आहे असं वाटलं पण नंतर वाटलं की बरंच झालं. कालचा निर्जीव पुतळा पडला अन् मूर्तिपूजेचे कट्टर विरोधक असणाऱ्या डाव्यांची जी जळफळाट झाली ते पाहून कॉलेजवयात डाव्यांकडून जी तुच्छपणाची वागणूक मिळाली होती त्याची भरपाईच झाली असं वाटलं-मन कृतकृत्य झालं!

अनिकेत पेंडसे

Similar News