व्हर्च्युअल खवय्येगिरी

Update: 2017-04-20 18:53 GMT

#foodie, #foodgasm #foodporn #nomnomm #eatingfortheinsta #foodlover #yummy #chefmode #cleanfood #hungry #eatinghealthy #eatgood #eattherainbow #eatrealfood# eatstagram# yummy# yummie# yumm# yumyum# yummi# yummm# yummyinmytummy #yummmm #yummyfood #yumyumyum #yums #dessert #desserts #dinner #dinnertime #dinnerisserved #breakfast #bread #lunch #lunchtime #lunchbreak

फेसबुक, ट्वीटर, स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम या सर्व सोशल साईटसवर सध्या खवय्यांची नवी पिढी पहायला मिळतेय. नवी पिढी??? हो मी तरी यांना नवी पिढीच म्हणेन. हे आहेत व्हर्च्युअल खवय्ये.

पुर्वी श्रीखंडाच्या वाट्यांवर वाट्या, जिलेबीची ताटच्या ताटं...दोन चार प्लेट मटण आणि सुग्रास जेवणाच्या पंगतीच्या पंगती...समाधानाची ढेकर. ही अस्सल खवय्याची ओळख होती...ज्या काळी पोट फुटेस्तोवर लोक जेवायची. लग्नात सणासुदीला पंगतीच्या पंगती जेवणं व्हायची. त्यानंतर कालांतरानं लोकं ठिकठिकाणच्या प्रसिध्द होटेल्स, वडापावच्या गाड्या, पाणीपुरीचा ठेला, खाउगल्ली अशा ठिकाणी जाऊन खानपानाचा आस्वाद घेउ लागले. खवय्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसाफिरी करत असत. अगदी इंदुरलाही खवय्ये पोहचत. पण आजच्या इन्स्टंट जमान्यात या खवय्यांना वेगवेगऴे पदार्थ चाखायचे तर आहेत. पण, वेळ कुठेय. परत डाएटचा आणि हायजिनचा प्रश्नही आहेच. मग काय जीभेची भूक डोळ्यावर भागवली जाते म्हणजे व्हर्च्युअली खवय्येगिरी केली जाते. सोशल साईट्सवर असंख्य पेजेसवरील फूड फोटोज, रेसिपी व्हिडीओज, फूड ब्लॉग्ज वाचणं, वेगवेगळ्या खाऊगल्लीची वर्णनं वाचणं, शेअर, लाइक, हॅश टॅगस् बस्स्स. झालं! सगळं कसं बसल्या जागी. आरामात. मग ते ओफिस असो घर असो वा कॉलेज. ना कुठे जायचे कष्ट ना काही करायचे प्रयत्न.

तस पाहिलं तर मुसाफिरी करणारे आजही आहेत. पण, ते आजकाल मोडतात फूड ब्लाँगर्स प्रकारात. जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवनवीन क्युझीन्स ट्राय करतात, त्याची रसभरीत वर्णन, भरपुर फोटोज, व्हीडीओज शेअर करतात आणि फायनली रेटींग्स देऊन तुम्ही त्या ठिकाणी जायला हवं की नाही हे सांगतात. तर काही जणांना आपण कुठल्या ठिकाणी जाउन काय आणि कसं खातोय हे लवकरात लवकर चेक-इन आणि फोटो शेअर करुन सांगण्याचीच जास्त घाई असते. अरे जरा मनसोक्त चव पण घ्या की! मग आरामात करा फोटो शेअर!

असो बॅक टू व्हर्च्युअल खवय्येगिरी. मी तर म्हणेन अशी व्हर्च्युअल खवय्येगिरी करण्यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन त्या पदार्थांचा खराखुरा आस्वाद घ्या. ती चव जीभेवर रेंगाळू द्या. तेल-तूपाचं मोजमाप करु नका. एक दिवस जरा जास्त मसालेदार खाल्लं तर काय हरकत आहे. क्षुधाशांती, भरपेट, मनसोक्त हे खरेखुरे हॅशटॅगस् अनुभवून पाहा. गोली मारो डाएट को. फक्त डोळे नाही रसना म्हणजेच जीभेलाही खराखुरा आस्वाद घेउ द्या. आत्माशांती मिऴवा.

 

  • अदिती दातार-भातंब्रेकर

 

Similar News