रेडिओथेरपी उपचार म्हणजे काय?

Update: 2017-02-25 09:34 GMT

कॅन्सर उपचार - रेडिओथेरेपी

कॅन्सर उपचारामध्ये रेडीओथेरेपी उपचाराचे अनन्यसाधारण महत्व आहे. साधारणपणे एकूण कॅन्सर रूग्णांच्या 65 टक्के रूग्णांना रोडीओथेरेपीचे उपचार त्यांच्या हयातीत घ्यावे लागतात. परंतु रेडिओथेरेपी बद्दल एकूणच समाजमनामध्ये प्रचंड गैरसमज आहेत आणि ते दूर करण्यासाठी आजपर्यंत कोणीही शिस्तबद्ध प्रयत्न केलेले नाहीत. त्या विषयाचा तज्ञ म्हणून मलाही जबाबदारी झटकता येणार नाही

 

रेडीओथेरपीचे उपचार म्हणजे नक्की काय?

किरणोत्सार उपचार जेव्हा कॅन्सर बरा करण्यासाठी वापरले जातात तेव्हा त्यालाच रेडिओथेरेपी असं म्हणतात. बऱ्याच जणांनी छातीचे एक्स-रे काढलेले असतात पण त्यांना रेडिओथेरेपीचे उपचार करण्यासाठी फार भिती वाटत असते. त्यांना ते माहीत नसते की साधारणपणे दोन्ही गोष्टी तत्वतः सारख्याच असतात. फरक फक्त एवढाच आहे की रेडिओथेरेपीमध्ये एनर्जी जास्त असते.

रेडिओथेरेपी कॅन्सर कसा बरा करते ?

शरीरात असणाऱ्या नॉर्मल पेशी बनण्याच्या प्रक्रियेत बिघाड होऊन, नॉर्मल पेशी वेगळ्या व पर्माणापेक्षा जास्त वाढता. त्या प्रक्रियेला कॅन्सर म्हणतात. अशा पेशी बनण्यासाठी डी.एन.ए अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते. रेडिएशन हे डी.एन.एला इजा पोहोचवून त्यापासून नवीन पेशी बनण्याची प्रक्रीया थांबवतं व कॅन्सर नष्ट करते.

रेडिओथेरेपीचे दुष्परिणाम असतात का?

रेडिओथेरेपीचे उद्दिष्ट हे जास्तीत जास्त रेडीएशन डोस कॅन्सर पेशींना व कमीत कमी किंवा ऩगण्य रेडिएशन आजूबाजूच्या नॉर्मल पेशींना असे असते. रेडीएशन डोस व कॅन्सर बरा होणं हे एकमेकांशी निगडीत असून जास्तीतजास्त डोस दिल्यास रोग बरा होण्याचे प्रमाण वाढते. परंतु रेडिएशनमुळे आजूबाजूच्या नॉर्मल पेशींना होणारा अपाय दुर्लक्षित करता येत नाही. अशावेळी उपचारांसाठी सुवर्णमध्य साधणे अधिक गरजेचे व कसोटीचे असते

रेडिएशन शरीराच्या ज्या भागाला दिले जाते तेथेच ते काम करते यालाच लोकल ट्रिटमेंट म्हटले जाते. ते गोळ्या औषधांसारखे सूंपूर्ण शरीरावर काम करत नाही. त्यामुळे रेडिएशनचे दुष्परिणाम देखील ज्या भागाला रेडिएशन मिळते तेथील नॉर्मल पेशी व अवयवांशी निगडीत असते. उदा. तोंडाच्या रोगासाठी रेडिएशन दिले असता काही प्रमाणात थुंकी बनवणाऱ्या ग्रथींना अपाय होऊन तोंड कोरडे पडते. तोंडाला छाले येणे इत्यादी त्रास होतात.

रेडीओथेरपी दुष्परिणामांचे मुख्यत: दोन प्रकार असतात. रेडिएशन सुरु असताना किंवा संपल्यावर पहिल्या तीन महिन्यांमध्ये होणाऱ्या दुष्परिणामांना acute असे संबोधले जाते व 6 महिन्यांनंतर होणाऱ्या दुष्परिणांमाना cronic संबोधले जाते.

रेडीओथेरपी उपचारांचे दोन प्रकार असून जेव्हा रेडिएशन सोर्स शरीराबाहेर ठेऊन रेडिएशन दिले जाते त्याला EBRT म्हणतात. तसेत रेडिएशन सोर्स रोगामध्ये किंवा रोगाच्या बाजूला ठेऊन देण्याच्या पद्धतीला ब्रॅकी थेरेपी असे म्हटले जाते

EBRT उपचार TELT COBALT किंवा LINEAR ACCELEATER या मशिनदेवारे दिले जातात. रूग्णाचा नेहमी येणारा प्रश्न म्हणजे कुठल्या मशीनद्वारे आम्ही उपचार करावे. टेले कोबाल्ट(TELE COBALT) या मशीनवर रेडिएशन आर्थिकदृष्ट्या स्वस्त असून LINEAR ACCELEATER एवढेच परिणामकारक आहे. परंतु रोगाच्या आजूबाजूच्या नॉर्मल पेशी किंवा अवयव यांना अधिक प्रमाणात रेडिएसन मिळाल्यामुळे अधिक जास्त प्रमाणात दुष्परिणाम होतात. आर्थिक दृष्ट्या परवडणारे असेल तर लिनियर अँक्सिलेटर द्वारे उपचार घेण्यास प्राथमिकता द्यावी.

लिनियर अँक्सिलेटर हे अत्याधुनिक यंत्र असून त्याद्वारे हवे तिथेच तंतोतंत रेडिएशन देणे शक्य होते. त्यामुळे रेडिओथेरेपिचा मूळ उद्देश जास्तीतजास्त रेडिएशन रोगाला व कमीतकमी बाजूच्या नॉर्मल पेशींना साधता येण्यास मदत होते.

रेडिओथेरेपिचे उपचार बरेच दिवस चालणारे असून, साधारणपणे आठवड्यातून पाचवेळा शनिवार, रविवार वगळता अंदाजे महिना ते दीड महिना चालते. त्यामूळे रूग्णांकरीत व नातेवाईकांकरीता दररोज येणे प्रवासाच्या दृष्टीने जिकरीचे होते किंवा रूग्ण बाहेर गावातून येत असल्यास रूग्णासाठी मुंबईसारख्या शहरात राहणे अधिक खर्चीक होते. त्यामुळे आपल्या जवळच्या ठिकाणी सुविधा असल्यास तेथेच उपचार घेण्यास प्राधान्य द्यावे. रेडिओथेरेपी उपचाराचे खालीलप्रमाणे प्रकार आहेत.

1)CONVENTIONAL 2D रेडिओथेरपी- ही पद्धती सध्या फार कमी प्रमाणात वापरली जाते. मुख्यत्वे पॅलेटीब उपचारासाठी उपयोग केला जातो.

2) 3 DIMENTIONAL CONFERMAL रेडिओथेरपी- सिटी स्कॅन, एम.आर.आय, पेट स्कॅन याच्या उपलब्धतेमुळे कॅन्सर रोगाचे मोजमाप तंतोतंत करणे सोपे झाले आहे. कॅन्सर नॉर्मल अवयवांपासून किंवा पेशीपासून किती दूर आहे याबाबतची माहिती मिळाल्यामुळे रेडिओथेरपी precisely plan करणे सोपे झाले आहे. 3DCRT यापद्धतीचा वापर करून कॅन्सर पेशींना जास्तीत जस्त रेडिएशन डोस देण्याबतच जवळील नॉर्मल अवयवांना कमीतकमी डोस देता येतो. तसंच ट्रीटमेंट प्लॅन पाहून रोगाच्या व नॉर्मल अवयवांना किता डोस मिळत आहे हे देखील पाहता येते. म्हणून शक्य असल्यास किमान 3D CRT या उपचार पद्धतीसाठी आग्रही असावे..

3) IMRT - ब-याच वेळेला कॅन्सर रोग हा अवघड ठिकाणी असतो किंवा एखादे सेंसेटीव्ह अवयव कॅन्सने वेढलेला असतो अशा वेळेस नॉर्मल अवयवाला वाचविणे किंवा रोगाला व्यवस्थित डोस न मिळणे यासारख्या समस्या उद्भवतात. अशा प्रसंगी आय.एम.आर.टी टेक्निक कामाला येते. यामध्ये मुख्यत: आपण एक रेडिएशन फिल्डमध्ये वेगवेगळी इन्टेसीटी वापरली जाते. त्यामुळे एकच टार्गेटमध्ये वेगवेगळे रेडीएशन डोसेस वापरता येतात.

4) IGRT- कॅन्सर रोगभोवती असणाऱ्या नॉर्मल अवयवांना कमीतकमी रेडिएशन देण्यामुळे रेडिएशन फिल्ड छोट्या आकाराच्या वापरल्या जातात. किंवा अवयवांच्या अंतर्गत हालचालींमुळे कर्करोग देखील चुकण्याची शक्यता असते. अशावेळी रेडीएशन देण्यापूर्वी एमेज देऊन टार्गेट प्लॅन केल्यानुसार असल्याची खात्री केली जाते. अशा उपचार पद्धतीला IGRT म्हणतात. यासाठी एक्सरे, सोनोग्राफी किंवा सी.टी स्कॅन यातील कुठलीही टेक्नॉलॉजी वापरता येते.

५) V-MAT (Volumetric Arc Therapy)- नवीन टेक्नॉलॉजीचा हा उत्तम आविष्कार असून रेडिएशन मशिन ३६० मध्ये कोठेही न थांबता मार्गात येणाऱ्या नॉर्मल अवयवांना वगळून टार्गेटमध्ये जास्तीत जास्त रेडिएशन दिले जाते. उपचारासाठी केवळ २ ते ३ मिनिटे लागत असल्यामुळे दिवसाकाठी एका मशिनवर बऱ्याच रूग्णांचे उपचार करणे शक्य होते.

६) SRS/SRT (स्टेरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी व स्टेरिओटॅक्टिक रेडिओथेरपी) – छोटया कॅन्सर गाठीवर उपचार करण्यासाठी लागणारा संपूर्ण रेडिएशन डोस एकाच वेळी 1-2 मि.मि इतक्या तंतोतंतपणे दिला जातो. त्याला स्टेरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी म्हटले जाते किंवा एकापेक्षा जास्त सेटिंगमध्ये दिला देल्यास त्याला स्टेरिओटेक्टिक रेडिओथेरपी असे म्हटले जाते. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे एक दीड महिन्याऐवजी एक दिवस ते आठवड्यामध्ये उपचार पूर्ण होतात. परंतु मोठ्या आकाराच्या गाठीसाठी हे वापरता येत नाही.

डॉ.दिलीप निकम, विभाग प्रमुख, रेडिओथेरपी विभाग, कामा रुग्णालय, मुंबई

Similar News