Delta plus Variant: 'डेल्टा' व्हेरिएन्ट सर्वांधिक घातक: डब्लूएचओ

WHO urges fully vaccinated people to continue to wear masks as delta Covid variant spreads डेल्टा’ प्लस व्हेरिएन्ट सर्वांधिक घातक: डब्लूएचओ

Update: 2021-06-26 15:30 GMT


अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएन्ट चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावावर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान या नवीन व्हेरिएन्टचा संसर्ग रोखण्यासाठी व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या Who च्या प्रमुखांनी सांगितलं आहे की, कोरोना विषाणूचा 'डेल्टा' व्हायरस हा व्हेरिएन्ट भारतात पहिल्यांदाच आढळला असून हा आत्तापर्यंतचा सर्वात संसर्गजन्य प्रकार आहे. सोबतच हा व्हेरिएन्ट किमान ८५ देशांमध्ये पसरत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं.

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहेनॉम घेबरेयेसस म्हणाले की, गरीब देशांमध्ये लसींची अनुपलब्धता डेल्टा हा व्हेरिएन्ट पसरविण्यात उपयुक्त ठरत आहे. दरम्यान एका बैठकीत ते म्हणाले की, श्रीमंत देशांना विकसनशील देशांना लस देण्याची इच्छा नाही. मात्र, गरीब देश लस नसल्यामुळे निराश झाले आहेत. जर लसच नसेल तर ते काय देतील?

वृत्त संस्था एपीच्या रिपोर्टनुसार, डब्ल्यूएचओ चे प्रमुख म्हणाले की, दशकांपूर्वी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्याचा धोका जागतिक समुदाय करत आहे. ज्याप्रमाणे एड्स तसेच २००९ मधील स्वाईन फ्लू च्या संसर्गादरम्यान गरीब देशांना लस ही संसर्ग पसरल्यानंतर दिली गेली होती.

ते म्हणाले, "एचआयव्ही श्रीमंत देशांमध्ये पसरल्यानंतर, अँटी रेट्रोव्हायरल औषधे गरीब देशांपर्यंत पोहोचण्यास जवळपास १० वर्ष लागली. आपणही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करणार आहोत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

गरीब देशांना लसींचे वितरण करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या "कोवॅक्स" या संस्थेने आपलं लक्ष पूर्ण केलेलं नाही.

या व्यतिरिक्त ब्रिटन, अमेरिका आणि इतर देशांनी केलेल्या आश्वासनांनुसार कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे काही कोटी डोस सुद्धा लवकर येण्याची अपेक्षा दिसत नसल्याचं मत Who च्या प्रमुखांनी व्यक्त केलं आहे.

डब्ल्यूएचओ चीफचे वरिष्ठ सल्लागार डॉ. ब्रूस आयलवर्ड यांनी यावेळी सांगितलं की, आम्ही या महिन्यात कोवॅक्सच्या माध्यमातून अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि फायझर(जोन्सन्स आणि जॉन्सन) लसींचा एक ही डोस या देशांना दिलेला नाही. त्याचप्रमाणे आमचा प्रत्येक पुरवठादार या काळात पुरवठा करण्यास असमर्थ ठरला आहे. कारण इतर देश उत्पादनाची मागणी करत आहेत,जे अतिशय तरुण लोकांचं लसीकरण करत आहेत, ज्यांना धोका नाही.

काही देशांमध्ये लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. मात्र, संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. लसीकरण न झालेल्या लोकांमध्ये अधिक वेगाने कोरोना व्हायरसचा प्रसार होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. त्यातच कोरोना विषाणूंचे नवीन व्हेरिएन्ट येत असून काही दिवस असंच घडत राहणार आहे. हे रोखण्यासाठी तातडीने सर्व शक्य साधनांचा वापर करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. त्यासाठी सर्व देशांना लस मिळणं गरजेचं आहे.

अलीकडेच व्हाईट हाऊसचे मुख्य वैदकीय सल्लागार डॉ. एंथनी फाउची यांनी डेल्टा व्हायरस संदर्भात इशारा दिला होता. की, कोविड - १९ साथीचा आजार नष्ट करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांमध्ये कोरोना विषाणूचा सर्वात संसर्गजन्य प्रकार 'डेल्टा' व्हायरस हा आहे.

एंथनी फाउची म्हणाले की, अमेरिकेमध्ये संक्रमित व्यक्तींपैकी २० टक्के व्यक्ती हे डेल्टा या व्हेरिएन्टने संक्रमित झाले आहेत.

दरम्यान नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण-पूर्व आशियामधील आपल्या सदस्यांना सार्वजनिक आरोग्य सुविधा बळकट करण्यास सांगितले आहे, तसेच सामाजिक अंतराचे पालन करत लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

Tags:    

Similar News