विशू चा झाला नाना : हे होतं नाना पाटेकर यांचं मुळ नाव...

दमदार अभिनय, जबरदस्त संवादशैली आणि आपल्या आवाजाने, डोळ्यांनी घायाळ करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच नाना पाटेकर .. परंतु नाना पाटेकर यांचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का? नाही ना..! तर थांबा घाई करू नका... हि बातमी पूर्ण वाचा..

Update: 2023-04-10 11:03 GMT

नाना पाटेकर यांच्या अनेक मुलाखतीआपण पाहिल्या असतील. पण त्या पैकी एका मुलाखती दरम्यान नाना यांनी त्यांच्या नावा बद्दल सांगितलं.... नाना पाटेकर यांचे वडील मुंबईला काम निमित्त असायचे आणि नाना हे आई सोबत मुरू जंजिरा येथे असायचे यावेळी नाना यांचं खरं नाव होतं विश्वनाथ ..

गाव कडे सगळे नाना पाटेकर यांना विश्वनाथ म्हणून ओळखायचे आणि शाळेतील मित्र सगळे नानांना विशू म्हणून हाक मारायचे. पण नानांची आई त्यांना प्रेमाने नाना या नावाने हाक मारायची.




 

पुढील शिक्षणासाठी नाना हे मुंबईत आले. नंतर मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये नाना पाटेकर यांनी सर्व कागदपत्रावर नाना पाटेकर हे नाव लावल .

आणि फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांना नाना या नावाने ओळखू लागले. आभिनयातला प्रत्येक व्यक्ती नाना या नावाने त्यांना ओळखू लागले.

अभिनयाव्यतिरिक्त नाना समाजकार्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या नाना या नावाने अनेक अवॉर्डही आहेत. मात्र यासर्व अवॉर्ड मध्ये नाना यांचं पहिलं नॅशनल अवॉर्ड म्हणजेच लक्षवेधी अवॉर्ड, परिंदा या चित्रपटासाठी मिळालेलं बेस्ट सँपोर्टींग ऍक्टर अवॉर्ड.




 

अर्थात परिंदा, क्रांतिवीर, पक पक पकाक, अपहरण, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट, आपला माणूस अश्या अनेक चित्रपट नाना पाटेकर यांनी विविधरंगी अभिनय सादर कला आहे. त्यामुळे नाना नेहमीच प्रेक्षकांच्या फेव्हरटे लिस्टमध्ये असतात.

Tags:    

Similar News