शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा आमचा त्यांना पाठींबा – यशोमती ठाकुर

राज्यांत सत्ता स्थापनेला वेग आला असुन वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. रोज राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री कोणाचा भाजपचा की, शिवसेनेचा ही चर्चा रंगत असतांना कॉंग्रेस कार्य अध्यक्षा यशोमती ठाकुर यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा आम्ही पांठीबा देउ अस मत यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केलयं.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतांची पाहणी करत असतांना सरकारने आता सत्ता स्थापनेच भांडण सोडून शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे,  नाही तर शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा कॉंग्रेसचा त्यांना पाठीबा असेल असं यावेळी यशोमती ठाकुर यांनी स्पष्ट केलं.