Home > Uncategorized > प्रज्ञा सिंहचा लोकांची सहानभुती मिळवण्याचा डाव?

प्रज्ञा सिंहचा लोकांची सहानभुती मिळवण्याचा डाव?

प्रज्ञा सिंहचा लोकांची सहानभुती मिळवण्याचा डाव?
X

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह आज मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर होत्या. यावेळी संपूर्ण सुनावणी दरम्यान प्रज्ञासिंह उभीच होती. न्यायालयाचं कामकाज संपल्यावर प्रज्ञासिंह आपल्या वकीलावर चांगलीच भडकली होती. “जोपर्यंत मी दोषी म्हणून सिद्ध होत नाही, तोपर्यंत मला या गोष्टी दिल्याच पाहीजेत अस साध्वीने म्हटले आहे. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर हवं तर मला फासावर लटकवा” अशा शब्दात तिने वकिलांना सुनावलं.

मुंबई सत्र न्यायालयात दुपारी १ वाजता सुनावणीला सुरूवात झाली. यावेळी प्रज्ञा सिंहला आरोपींसाठीच्या खुर्चीवर बसायचं होतं. मात्र, ज्या खुर्चीवर ती बसणार होती, ती मोडकी होती. त्यामुळं प्रज्ञा सिंहनं पूर्ण सुनावणी दरम्यान उभं राहण्याचा निर्णय घेतला. याबाबत प्रज्ञा सिंहचे वकील रणजीत सांगळे म्हणाले की, प्रज्ञा सिंह कॅन्सरच्या रूग्ण आहेत, सुनावणी दरम्यान त्यांना देण्यात आलेली खुर्ची ही मोडकी होती. शिवाय त्यांच्या मणक्याला इजा झाली असल्यानं त्यांना जास्त वेळ बसता येत नाही. तर ज्या ठिकाणी त्यांना उभं राहावं लागलं त्या खिडकी जवळ धूळ होती. आपण भारताच्या न्याय व्यवस्थेमध्ये जिथं विशेष न्यायालय आहे, तिथं थोडी स्वच्छता पण ठेवू शकत नाही का, किंवा तिथं बसलेलल्या लोकांना चांगल्या खुर्च्या सुद्धा देऊ शकत नाही का, असे प्रश्न प्रज्ञा सिंहनं वकिलांनाचं विचारल्याचं सांगळे यांनी सांगितलं.

साध्वीच्या आरोग्याविषयी पूर्वकल्पनाच दिली नाही – अविनाश रसाळ, विशेष सरकारी वकील

न्यायालयात आहेत त्या खुर्च्यांमधूनच साध्वीला खुर्ची देण्यात आली होती. नवीन काही व्यवस्था नव्हती. त्यांना जो काही शारिरीक आजार आहे त्याबद्दल आम्हांला काहीच कल्पना नाही आणि त्याविषयी त्यांनी तसं काही सांगितलंही नव्हतं.

न्यायालयामध्ये एखादा आरोपी शारिरीक दृष्ट्या सुदृढ नसेल तर त्या आरोपीसाठी व्हिलचेअरची व्यवस्था केली जाते. मात्र, सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अशा प्रकारची कोणतीच मागणी केली नव्हती. त्यामुळे प्रज्ञा सिंहने संपूर्ण सुनावणी ही उभी राहूनच पूर्ण केली यामागे लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तर नव्हता ना, अशी चर्चा न्यायालयाबाहेर सुरू होती.

Updated : 7 Jun 2019 6:12 PM GMT
Next Story
Share it
Top